Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शॉपिंग इन द रेन!

शॉपिंग इन द रेन!
दरवर्षी पावसाळा न चुकता येत असला तरी फक्त पावसाळा special अशा गोष्टी म्हणजेच रेनकोट, छत्र्या, गमबूट इत्यादी. पण यामधील fashions दर वर्षी थोडय़ाफार प्रमाणात बदलत असतात. जसे पूर्वी लांब दांडय़ाची छत्री वापरत असत, ती पद्धत जाऊन तिची जागा फो‍ल्डिगच्या छत्रीने घेतली. कालांतराने तीसुद्धा जड वाटू लागल्यामुळे थ्री फोल्ड छत्रीचा जमाना आला आणि परत grandfather umbrella वापरात दिसू लागली. छत्री कितीही मोठी व मजबूत असली तरी वाऱ्यामुळे चिंब भिजायला होतेच. त्यामुळे कदाचित पण कॉलेज गोअर्स रेनकोट किंवा windcheater जास्त वापरतात. एकतर पावसापासून संरक्षण तर होतेच, थोडी स्टाइल पण मारता येते व हातही मोकळे राहतात. 

webdunia
कोकणात भातशेती करणाऱ्या बायका इरलं वापरायच्या. डोक्यापासून ते पायापर्यंत पांघरून शेतात काम करायच्या. यावरून रेनकोट्स बनवण्याची कल्पना आली असेल. सुरुवातीला रबराचे रेनकोट्स होते. प्रेझेन्टेबल दिसणं महत्त्वाचं झाल्यामुळे plastic चे रेनकोट्स वापरत आले. मग ट्रान्सपरन्ट रेनकोट्स मार्केटमध्ये आले त्याने रेनकोटचं रूपडं बदलूनच गेलं.

webdunia
 
रेनकोटचा धाकटा भाऊ म्हणजेच windcheater लहान असल्यामुळे त्याची उंची ही कमीच, त्यामुळे हा कंबरेपर्यंतच असतो. भिजण्याचा तर आनंद घ्यायचाय, पण डोकं व छाती भिजून आजारी पडायचं नाहीये त्यासाठी हा फार उपयुक्त आहे. मधल्या काळात windcheater बरोबर pants आणि स्कर्टस् पण आले होते. काढण्या-घालण्याच्या गरसोयीमुळे ते मागे पडले.

इतके सगळे आपले पावसापासून संरक्षण करायला असले तरी कधीतरी पावसात चिंब भिजायला काहीच हरकत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्वाद आणि आरोग्याचा राजा : टोमॅटो