Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साधेपणातलं सौंदर्य

साधेपणातलं सौंदर्य
NDND
साधेपणातील सौंदर्य कुणालाही आकर्षित करते. हे शब्द शब्दश: खरे ठरतात ते चित्रपटातील चाळीसच्या दशकांतील नायिकांबद्दल. मधुबाला, नर्गिस, मीनाकुमारी, सुरैया या नायिका आजही पडद्यावर पाहताना तितक्याच ताज्या, टवटवीत वाटतात. कदाचित म्हणूनच त्यांचे सौंदर्य फॅशनच्या रूपात 21 व्या शतकात परत आले आहे. चाळीसच्या दशकातील केशरचना, अगदी मोजकाच मेकअप, वेशभुषा व ज्वेलरी यांचा प्रभाव आज जाणवतो आहे.

webdunia
NDND
मेकअप व सौंदर्य वाढविणारे अगदी मोजकेच साहित्य उपलब्ध असणार्‍या या युगात देखिल नायिकांचे सौंदर्य मंत्रमुग्ध करीत होते. त्यावेळी सौंदर्य वाढविण्यासाठी त्यांना प्लास्टिक सर्जरी किंवा डाएटिंगची आवश्यकता भासत नव्हती. तांत्रिकदृष्ट्या सौंदर्य वाढविणार्‍या कॅमेऱ्याची तर त्यावेळी कोणी कल्पनाही केली नसेल. लिपस्टिकच्या विविध शेड्स उपलब्ध नसतानाही गुलाबी ओठ, हलका मस्कारा, पातळ लायनरनेही हरिणीसारखे चपळ डोळे, बाणासारखा आय ब्रो आणि हवेत उडणारे कुरळे केस पाहणाऱ्याचा जीव घायाळ करायचे. चाळीशीच्या युगातील हा लूक फॅशन आजच्या युगात आपले पाय रोवत आहे.

webdunia
NDND
या युगातील लूक आणण्यासाठी मेकअप आर्टिस्ट व स्टायलिस्ट यांनी काही प्रयोग करून पाहिलेत. यात छोटे छोटे कुरळे केस चेहर्‍यावर सजविले गेले. चेहर्‍यानुसार लिपस्टिक व ओठ जाड दिसण्यासाठी क्रिमी लिपस्टिकचा वापर केला. वरच्या ओठासाठी लिक्विड जेल लायनरचा वापर केला. आयब्रो थोडी जाड व नैसर्गिक दिसेल अशीच ठेवली. त्याचप्रमाणे भुवयांना मस्कारा लावला. याशिवाय मोठ्या खड्यांची अंगठी, पूर्वीसारखे गाऊन, हेअर बॅन्ड, पर्स, सँडल आदींनी मॉडेलला सजविले.

webdunia
NDND
हा महिलांसाठी परिपूर्ण असा मेकअप असल्याचे मेकअप करणाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रत्येक युगातील सौंदर्य आपल्या काळातील महत्त्व राखते. आम्ही महिलांचा प्रत्येक गुण, आंतरिक शक्त‍ि, त्यांची प्रेम करण्याची भावना व महत्त्वाचे म्हणजे त्यांचे स्त्रीत्व दर्शवू इच्छितो, असे हे सौंदर्य तज्ज्ञ म्हणतात. आता सौंदर्य खुलविण्यासाठी विविध पर्याय आहेत. केस कुरळे करण्यासाठी हेअर जेल उपलब्ध आहेत. आय लायनर, आय शॅडो, लिपस्टिक, मस्काराच्या विविध रंगातील शेड उपलब्ध आहेत. यामुळे हे काम थोडे सोपे झाले.

ज्याप्रमाणे रिमिक्सच्या युगातही लता-रफी, आशा-किशोर यांची गीते रसिकांच्या हृदयावर आजही राज्य करीत आहेत. त्याचप्रमाणे मधुबालाच्या मोहक हास्याचे पोस्टर संगणकाच्या स्क्रिनवर आणि वॉलपेपरवर पहायला मिळते.ही त्या सौंदर्याला दिलेली दाद म्हणावी लागेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi