दररोज चांगले दिसावं म्हणून आपण बरेच कपडे विकत घेतो, जेणे करून पर्याय कमी पडू नये. जास्त कपडे म्हणजे जास्त खर्च. पण असं काहीच होणार नाही आम्ही सांगत आहोत की पैसे जास्त खर्च न करता दररोज स्टायलिश लुक कसे मिळवता येईल.
1 पांढरा आणि काळा शर्ट आणि टी-शर्ट-
आपल्या वार्डरोब मध्ये एक पांढरा आणि एक काळा रंगाचा शर्ट आणि टी शर्ट आवर्जून ठेवा. हे आपण कोणत्या ही लोअर जसे की जींस, ट्राउझर, सिगारेट पॅन्ट, वाइड लेग्ड पॅन्ट, स्कर्ट,जॅगिंग किंवा प्लाझो सह घालू शकता. जसे आपण एका बॉटम सह विविध प्रकाराची शर्ट्स आणि टीशर्ट्स घालता तसेच या दोन्ही शर्ट आणि टी शर्ट सह विविध प्रकारचे लोअर्स घालून प्रयोग करू शकता.
2 ब्लू डेनिम-
आपल्याला काहीही घालायचे आहे जसे की शर्ट्स, टीशर्ट किंवा शॉर्ट कुर्ता, यांच्या सह ब्लू डेनिम घाला. ह्या डेनिम चा सर्वात मोठा फायदा असा आहे की हे घातल्यानं कॅज्युअल आणि फॉर्मल दोन्ही लूक मिळतात. या डेनिम ला आपण ऑफिस मध्ये देखील घालून जाऊ शकता आणि संध्याकाळी मित्रांसह देखील बाहेर जाताना घालू शकता.
3 दोन फुटवेयर -
हिवाळ्यासाठी एक बंद शूज जसं की फॉर्मल बैली आणि बूट्स ठेवा. जेणे करून फॉर्मल मीटिंग मध्ये जाण्यासाठी बैली वापरू शकाल आणि आपले लूक कूल बनविण्यासाठी बूट्स घाला. अशा प्रकारे उन्हाळ्यात देखील एक ओपन सँडल आणि जूती आपल्या रॅक मध्ये ठेवा. फॉर्मल लूक साठी जूती वापरा आणि इतर दिवशी ओपन सँडल वापरा.
4 LBD -
ऑफिस च्या पार्टी साठी हजारो खर्च करण्यापेक्षा आपल्या जवळ एक LBD (लिटिल ब्लॅक ड्रेस)ठेवा. आपण हा ड्रेस ऑफिसच्या बाहेर मित्रांसह पार्टी मध्ये देखील घालू शकता.या सह फुटवेयर म्हणून बैली,बूट्स, ओपन सँडल,जूती किंवा हिल्स काहीही वापरू शकता.
5 बेसिक कुर्तीज -
रंगीत छापील कुर्त्या विकत घेण्याऐवजी आपल्या वार्डरोबमध्ये बेसिक कलर्स जसे की पांढऱ्या, पिवळ्या, काळ्या,निळ्या अशा कुर्त्या विकत घेऊ शकता.हे आपण कोणत्याही लोअर्स सह घालू शकता. आपण ह्याच्या सह कोणतेही फुटवेयर घालू शकता, पण चांगल्या लूक साठी जूती घाला.