Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

समरसाठी खास क्यूलॉट्स

समरसाठी खास क्यूलॉट्स
उन्हाळा म्हटलं की घाम, चिकचिक आणि अस्वस्थता आलीच. त्यामुळे या दिवसात सुती आणि आरामदायी कपड्यांचा पर्याय निवडला जातो. अशा प्रकारांमध्ये पलझोसोबतच क्यूलॉट्सने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. हा ट्रेंड गेल्या वर्षापासनूच आहे पण यंदा हटके डिझाईन्सचा बोलबाला असेल. वॉर्डरॉब अपडेट करायच्या विचारात असाल तर क्यूलॉट्सची नक्की खरेदी करा. क्यूलॉट्‍सच्या य ट्रेंडवर एक नजर टाकूया.... 
 
* पार्टी, कॉलेज किंवा व्हेकेशनसाठी कपडे खरेदी करत असाल तर फ्लोरल क्यूलॉट्सना प्राधान्य देता येईल. विविध रंग आणि कॉम्बिनेशन्सचे क्यूलॉट्स लक्षवेधक ठरत आहेत. 
 
* थोडा हटके लूक मिळवायचा असेल तर फ्रंट लिस्टवाले क्यूलॉट्स ट्राय करा. क्रॉप टॉपसोबत ही फॅशन कॅरी करता येईल. 
 
* ऑफिससाठी फ्लेअरवाले हलक्या रंगांचे क्लूलॉट्स घेता येतील. 
 
* टिपीकल क्यूलॉट्सऐवजी काही वेगळं शोधत असाल तर तिरपा खिसा असलेले क्यूलॉट्स निवडा. हे अँटी फिट क्यूलॉट्स कॅज्युअल ऑकेजनला कॅरी करता येतील. 
 
* जिऑमट्रिक प्रिंटवाल्या मोनोक्रोम म्हणजे काळ्या आणि पांढर्‍या रंगाच्या क्यूलॉट्स निवडता येतील. 
 
* आरामदायी, ट्रेंडी आणि कूल लूक मिळवण्यासाठी पिंक शेडमधले प्लेन क्यूलॉट्स निवडता येतील. काळ्या, निळ्या रंगाच्या टॉप्ससोबत पिंक क्यूलॉट्स कॅरी करता येतील. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जाणून घ्या बडीशेपेचे बडे लाभ