Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रेग्नेंसीनंतर करीनाने असे केले वजन कमी

प्रेग्नेंसीनंतर करीनाने असे केले वजन कमी
आपल्या मुलाला जन्म देऊन काहीच महिने झाले तरी करीना आधीसारखी स्लिम दिसू लागली आहे. हेच नव्हे तर प्रेग्नेंसीनंतर तिच्या चेहर्‍यावरची चमक उलट वाढलीच आहे. प्रेग्नेंसीदरम्यान करीनाने 18 किलो वजन वाढवले होते. आणि बेबी बर्थनंतर लगेच तिने आपले वजन आटोक्यात आणले. आपणही जाणून घ्या कश्या पद्धतीने तिने आपले वजन कमी केले ते:
एक ग्लास दूध
करीना कपूर स्वत:च्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी एक मोठा ग्लास दूध पिते कारण प्रेग्नेंसी दरम्यान आणि नंतर शरीरात कॅल्शियमची कमी होते आणि दुधामुळे ती पूर्ण होते. करीनाप्रमाणे एक ग्लास दूध म्हणजे आपल्या पूर्वीच्या शेपमध्ये येणे.
 
पाणी
करीना दररोज 8 ते 10 ग्लास गरम पाणी पिते. प्री आणि पोस्ट प्रेग्नेंसीमध्ये पाणीची आवश्यकता असते. तर गरम पाणी प्या आणि फिट राहा.

योग
करीना खूप वर्षांपासून योग करत आहे. तिच्याप्रमाणे योग मन, शरीर आणि आरोग्य संतुलित ठेवतं. ती शरीर लवचीक बनवण्यासाठी वॉर्म अप, पॉवर योग, सूर्य नमस्कार आणि श्वासाचे व्यायाम करते.
 
हिरव्या पाले भाज्या
करीना कपूर शुद्ध शाकाहारी आहे. ती आहारात मुसळी, पनीर, पोळी, पराठा, सोया दूध, डाळ, सलाड आणि सूप घेते. हे पदार्थ शरीर निरोगी आणि वजन नियंत्रित करण्यात मदत करतं.
 
प्रत्येक दोन तासात नाश्ता
नाश्ता शरीराला शक्ती देतं. परंतू आम्ही फ्राइड फूड खाऊन हा नियमाला बिगडवून देतो. परंतू करीना कपूर प्रोटीन शेक आणि फळांचा नाश्ता करते ज्याने एनर्जीही मिळते आणि वजन कमी होण्यात मदतही.

कार्डिओ
योग आणि शाकाहारी आहार घेतल्यानंतर करीना वजन कमी करण्यासाठी कार्डिओ करते. ज्याने तिला निरोगी राहण्यात मदत मिळते.
 
वॉक
मुलाला जन्म दिल्यानंतर करीनाने वॉक सुरू केले होते कारण पोस्ट प्रेग्नेंसीच्या लगेच नंतर व्यायाम करत नाही. म्हणून आधी वॉक करणे सुरू केले. नंतर योग आणि कार्डिओ द्वारे वजन नियंत्रित केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फ्रीजमधील थंड पाण्याचे 6 नुकसान!