वेगवेगळी कलर कॉम्बिनेशन्स करणं फक्त मुलींसाठीच असतं असं नाही तर तुम्हीही रॉकिंग रंगांचे प्रयोग करू शकता. काळा, पांढरा, ग्रे, ब्लू असे टिपिकल रंग वापरण्याचे दिवस केव्हाच मागे पडले आहेत.
मुलांच्या फॅशनविश्वात बरेच बदल घडले आहेत, घडत आहेत. मुलींची म्हटली जाणारी डिझाइन्स मुलांच्या पेहरावावरही उमटली आहेत. त्यामुळे फॅशनचा मेळ साधायचा असेल तर या हटके कलर कॉम्बिनेशन्सचा विचार करा.
* व्हाईट शर्ट किंवा पॅंटसोबत कोबाल्ट ब्लू रंगाचं कॉम्बिनेशन करता येईल. ब्लॅक अँड व्हाईटपेक्षा हे कॉम्बिनेशन बरंच वेगळं दिसेल.
* बाजारात रंगीबेरंगी चिनोज मिळतात. लाल रंगाची पँट असेल तर ग्रे शर्ट किंवा टी शर्ट कॅरी करता येईल. ग्रे पॅंटसोबत लाल रंगाचा शर्ट घालता येईल.
* बेज रंगासोबत एमराल्ड रंग ट्राय करा. कॅज्युअल, फॉर्मल अशा कोणत्याही ऑकेजनला हे कॉम्बिनेशन उठून दिसेल. यामुळे तुम्हाला हटक आणि ट्रेंडी लूक मिळेल.
* ब्लॅक अॅंोड व्हाईट कॉम्बिनेशन जुनं झालंय. ब्लॅकसोबत इतर अनेक रंग शोभून दिसतात.ब्लॅक आणि ब्राऊन हे कॉम्बिनेशन ट्राय करा. ब्लॅक आणि ब्राउनचा थाट राजेशाही आहे.
* टक्वॉइज रंगाच्या पॅंटसोबत क्रिमी व्हाईट शर्ट कॅरी करा. त्यावर ग्रे रंगाचं जॅकेट शोभून दिसेल.
* ग्रे पॅंटसोबत काय घालायचं असा प्रश्न पडला असेल तर मिंट ग्रीन रंगाचा शर्ट ट्राय करा. हे कॉम्बिनेशनही छान दिसतं.