आजची तरुणाई पाश्चिमात्य वस्तूकडे अधिक प्रमाणात झुकलेली आहे. आपण इतरांपेक्षा वेगळे दिसावे, यासाठी महाविद्यालयीन तरुण-तरुणी सतत धडपडत असतात, तसेच बाजारात कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू येत आहे, याकडे तरुणाईचे लक्ष लागून असते. बेल्ट हा जुना प्रकार असला, तरी त्यामध्ये आता विविध प्रकारचे बेल्ट बाजारात विकण्यासाठी आलेले आहेत. सध्या पॅरिगम डिझाइन बेल्ट बाजारात आलेले आहेत. प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग बेल्ट असला की, व्यक्तिमत्त्व खुलण्यास मदत होते, असे तरुणाईला वाटते.
तसेच एकदम हटके आणि बॉईश लूककडे अगदी रोजसुद्धा वापरण्याइतकी छान प्रकारातील कड्यांना मुलींची अधिक पसंती मिळत आहे, तर स्टील, तांबे, चंदेरी कड्यांना मुलांची अधिक पसंती आहे. मुली जीन्स, फॉर्मल बूटकडे पॅरलल या पद्धतीच्या ड्रेसवर कपड्यांचा एकदम रफ
आणि टफ लूक दिसत असल्याने याकडे तरुणाईचा कल आहे. नाजूक आणि सुंदर दिसणारे ब्रेसलेट कोणत्याही प्रकारच्या ड्रेसवर खुलून दिसतात. काही वेळेस वेगवेगळ्या प्रकारचे कडे घालत असल्यामुळे एक स्पेशल लूक मिळतो.
बेली शूज, कॉक्स, ब्लॅक बूट, पीप टूझ, अँकल लेंग्थ बूट इ. प्रकारच्या बूटांना तरुणींकडून अधिक मागणी केली जात आहे.
पॅरिगम डिझाइन बेल्टचे प्रकार : सिफिक गोल्ड, कॅज्युअल, न्युमिरिओ युनो, अरायव्हल कॉपर, ओलिवा, युशाइन असे विविध प्रकारचे बेल्ट बाजारात आलेले आहेत.
पॅरीगम डिझाइन बेल्टच्या किंमती : 50 रुपयांपासून पुढे.