बऱ्याच वेळा कुर्त्यासह ओढणी किंवा दुपट्टा घेणं अडचण जाणवते. या साठी काही अशा स्टाईल सांगत आहोत ज्यामुळे आपल्याला कुर्त्यावर दुपट्टा किंवा ओढणी घेण्याची गरज पडणार नाही.
1 अंगरखा स्टाईल कुर्ता- अशा प्रकारच्या कुर्त्यांमध्ये ओढणी घेण्याची गरज नसते. या वर आपण जूती घालू शकता . एक वेगळी स्टाईल दिसेल.
2 कोट स्टाईल कुर्ता- आपण एखाद्या समारंभात असा कोट स्टाईल कुर्ता घालू शकता जेणे करून आपला लूक वेगळा दिसेल आणि या वर ओढणी घेण्याची आवश्यकता नसेल.
3 जॅकेट सह कुर्ता- आपण कुर्त्यावर लॉन्ग जॅकेट, मिडीयम जॅकेट,शॉर्ट जॅकेट घालू शकता. आपण कुर्ता ट्रेडिशनल पासून वेस्टर्न कोणता ही घालू शकता.
4 कॅप स्टाईल कुर्ता- आपल्याला ओढणी घेणं जड होते तर आपण कॅप स्टाईल कुर्ता देखील घालू शकता या वर ओढणी घेण्याची गरज नसते. आपण जॉर्जेट,नेट,टिश्यू कापडाचे देखील कुर्ते कॅप स्टाईल बनवू शकता.
5 लॉंग स्लिट कुर्ता- अशा प्रकारचे कुर्ते जीन्स किंवा पायजमा सह परिधान करू शकता. हे वेगळे आणि स्टायलिश लूक देण्यासह आरामदायी असतात. स्लिट कमी करवून आपण ट्रेडिशनल लूक देखील देऊ शकता.