नववधूसाठी स्टायलीश ब्रायडल फुटवेअर

गुरूवार, 26 मार्च 2020 (14:19 IST)
लग्नात प्रत्येक नववधूला तिचा लूक सर्वात उठून दिसावा असं वाटत असतं. यासाठी ती तिच्या ब्यूटी स्टायलिस्टचा सल्ला घेते. तिच्या पेहरावापासून ते अगदी फुटवेअरपर्यंत लूक नेमका कसा असावा याविषयी विचार केला जातो. प्रत्येक विधीसाठी वेगवेगळा लूकठरवला जातो. साहजिकच लग्न ठरल्यावर नववधूला वेध लागतात ते तिच्या वेडिंग शॉपिंगचे. तुम्हीदेखील तुमच्या लग्नाच्या शॉपिंगबाबत चिंतेत असाल तर ही माहिती तुमच्या नक्कीच फायद्याची ठरेल. कारण लग्नातील  तुमच्या विविध लूकसाठी निरनिराळे ब्रायडल फुटवेअर तुमच्यासोबत आम्ही शेअर करत आहोत.
 
लग्नात तुम्ही कोणता पेहराव करत आहात यावर तुमचे फुटवेअर कसे असणार हे ठरतं. म्हणूनच ब्रायडल फुटवेअर खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी जरूर लक्षात ठेवा.
 
कोणतेही फुटवेअर खरेदी करताना सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे त्याची फिटिंग. ब्रायडल फुटवेअरसाठी तर ही गोष्ट फारच महत्त्वाची आहे. कारण लग्नात तुम्हाला हेव्ही साडी अथवा पेहराव, जड दागदागिने अशा अनेक गोष्टींचं ओझं सांभाळावं लागणार असतं. त्यात चालताना जर फुटवेअर चांगल्या फिटिंगचे नसतील तर तुम्हाला नक्कीच त्रास होऊ शकतो. यासाठीच ब्रायडल फुटवेअर खरेदी करताना ते परफेक्ट फिटिंग असलेलेच घ्या.
 
लग्नाची खरेदी म्हटली की खर्च हा होतोच. त्यात तुमचे लग्नातले आऊटफिट हजारो रूपयांचे असतात. त्यामुळे फुटवेअरदेखील त्याच तोडीचे असायला हवे. नाहीतर तुमचा संपूर्ण लूकच बदलू शकतो. यासाठीच ब्रायडल खरेदी करताना थोडा खर्च करण्यासाठी तयार राहा.
 
कधी कधी तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या पटकन मिळतीलच असं नाही. म्हणूनच तुमच्या खरेदीला फार उशीर करू नका. लग्नाची तारीख जवळ आल्यावर तुमची फार घाई होणार आणि तेव्हा हव्या तशा गोष्टी मिळतीलच असं नाही. यासाठी लग्नाच्या पेहरावासोबतच फुटवेअरची खरेदी करा. शिवाय यामुळे तुम्हाला त्याची फिटिंग व्यवस्थित आहे का ते तुमच्या आऊटफीटवर सूट होत आहेत का हे वेळीच पाहता येईल.
 
तुमचा लग्नसोहळा कोणत्या सिझनमध्ये आणि कुठे आहे हे आधीच विचारात घ्या. कारण त्यानुसार तुम्हाला शॉपिंग करणं सोपं जाईल. जर डेस्टिनेशन वेडिंग असेल तर तुम्हाला त्यानुसार तुमचे फुटवेअर निवडावे लागतील. ब्रायडल फुटवेअरचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध असतात. ज्यापैकी काही आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत.
 
अनेक नववधू त्यांच्या लेंहग्यासोबत हाय हील्स घालणं पसंद करतात. ज्यामुळे तुमच्या लेंहग्याची उंची, त्यामधील कॅनकॅनमुळे लेंहग्याचा फॉल खूप सुंदर दिसतो. तुम्हालाही असा फेअरी लूक हवा असेल तर हाय हील्स घालणं अगदी मस्ट आहे. ज्यामुळे तुम्ही आणखी सुंदर दिसाल.
 
ब्रायडलफुटवेअरचे प्रकार
प्लॅटफॉर्म हील्स
काही मुलींना प्लॅटफॉर्म हील्स फार आवडतात. मात्र लक्षात ठेवा लग्नात जर तुम्हाला आरामदायक वाटावं असं वाटत असेल तर प्लॅटफॉर्म हील्स निवडा. कारण पेन्सिल हिल्समुळे बराच काळ उभं राहणं तुम्हाला त्रासदायक वाटू शकतं. प्लॅटफॉर्म हील्सची उंची अशा पद्धतीने डिझाईन केलेली असते की त्यामुळे तुमचा तोल जात नाही.
 
किटन हील्स
जर तुम्हाला फार हील्सचे फुटवेअर घालणं आरामदायक वाटत नसेल. तर किटन हील्स तुमच्यासाठी अगदी बेस्ट आहेत. कारण कधी कधी थोडंसं हिल असलेले फुटवेअर घातल्यामुळे तुमचा लूक अगदी वेगळा दिसेल.
 
अँकल स्ट्रॅप ब्रायडल सँडल्स
जर तुम्ही लग्रात लेंहगा परिधान करणार असाल तर तुमची चाल मनमोहक व्हावी असं तुम्हाला नक्कीच वाटत असेल. अशा वेळी अँकल स्ट्रॅप ब्रायडल सँडल्स हा एक उत्तम पर्याय तुमच्यासाठी असू शकतो. ज्यामुळे तुमचे मेंदीने रंगलेले पाय नक्कीच सुंदर दिसतील.
 
वेजेस
वेजेस हा फुटवेअरचा एक ट्रेंडिंग प्रकार आहे. ज्यामध्ये हील्स आणि पायाच्या टाचेत एकसमान सोल लावण्यात आलेलं असतं. मात्र त्यामुळे तुमची उंची अधिक दिसते. जर तुम्हाला तुमची उंची वाढवायची असेल तर लग्नात वेजेस एक चांगला पर्याय ठरू शकेल.
 
पम्प्स
पम्प्स हा प्रत्येक मुलीसाठी ऑल टाईम फेव्हरेट फुटवेअर प्रकार आहे. जर तुम्हाला लग्रात पम्प्स घालण्याची इच्छा असेल तर ब्रायडल कलेक्शनमध्ये त्यासाठी फार चांगले पर्याय तुम्हाला मिळू शकतात.
 
मोजडी
लग्नातील निरनिराळ्या विधींसाठी निरनिराळे लूक केले जातात. जर तुम्ही एखाद्या  विधीला पंजाबी सूट घालणार असाल तर तुम्ही मोजडी नीच घालू शकता. पंजाबी आऊटफीटवर मोजडी छान दिसतात.
 
कोल्हापूर चप्पल
लग्नात तुम्ही जर नऊवारी नेसणार असाल तर कोल्हापुरी चप्पल तुम्ही यावर घालू शकता. आजकाल मार्केटमध्ये कोल्हापुरी चप्पलचे विविध प्रकार मिळतात. 
 
स्टीलेटो
स्टीलेटो हील्स हे फारच निमुळते हील्स असलेले फुटवेअर आहेत. या फुटवेअरमधून तुमचे पाय फारच सुंदर दिसतात. शिवाय यामुळे तुमचा लूकदेखील ग्लॅमरस आणि स्टायलीश दिसतो.
 
फ्लॅट हील्स
फ्लॅट हील्स घातल्यामुळे तुम्हाला जास्त आरामदायक आणि सुटसुटीत वाटतं. ज्यांना हिल्स घालणं जमत नाही अथवा ज्यांनी आधी कधीच हील्स घातलेले नाही. त्यांनी केवळ लग्नकार्यासाठी हील्स घालणं नक्कीच सोयीचं ठरत नाही. कारण यामुळे तुम्हाला चालताना त्रास होऊ शकतो. यासाठीच फ्लॅट हील्समधले काही पर्याय तुम्ही ब्रायडल फुटवेअरसाठी नीच निवडू शकता.
 
लेसी ब्रायडल फुटवेअर
लेस वर्क केलेले ब्रायडल फुटवेअर सध्या ट्रेंडमध्ये आहेत. त्यामुळे जर तुम्ही लग्नात अशा प्रकारचे फुटवेअर वापरले तर तुमचा संपूर्ण लूक सुंदर आणि नाजूक दिसू शकतो.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख Corona virus: : वृद्धांनी या प्रकारे घ्यावी काळजी...