मेंदी घोळताना, त्यात साधे पाणी न घालता चहाच्या पानांचे पाणी घाला. हे बनवण्यासाठी एक कप पाणी पातेल्यात घेऊन त्यात चहा घाला आणि जरा वेळ उकळून घ्या. नंतर त्यात मेंदी घोळून घ्या.
मेंदी घोळण्यापूर्वीच त्यात मेंदीचं तेल घाला. याने मेंदीला एकसारखा रंग येतो. तसंच मेंदी हलकी वाळल्यावर एका वाटीत पाणी घेऊन त्यात साखर मिसळून ते पाणी कापासाच्या मदतीने मेंदीवर लावा. रंग गडद होतो.
मेंदी वाळल्यावर आपण कापसाच्या मदतीने लोणच्याचं तेल देखील लावू शकता.
मेंदी वाळल्यावर आपण मेंदी हातावरुन काढू शकता परंतु पाण्याने धुऊ नये. यानंतर त्यावर काही वेळासाठी घरगुती बाम लावू शकता. बाम बोटांवर लावणे टाळा नाहीतर चुकीने डोळ्यात बोट गेल्याने त्रास होऊ शकतो.
मेंदी वाळल्यावर कापसाच्या मदतीने हलक्या हाताने मेंदीचं तेल लावावं. नंतर तीन तास हाताला पाणी लावू नये.