Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Wedding bridal lehenga निवड घेरदार घागर्‍याची

wedding bridal lehenga
, बुधवार, 29 नोव्हेंबर 2023 (23:15 IST)
Wedding bridal lehenga बघता बघता दिवाळी सरली . त्यापाठोपाठ लग्नसराई सुरू झाली आहे. लग्नाची तारीख ठरल की भावी वधू प्रावरणांच्या खरेदीमध्ये रमते. लग्नामध्ये प्रत्येक वधूला खास दिसायचं असतं. मेक अप, हेअरस्टाईल, दागिने या बरोबरच महत्वाची ठरते ती लग्नाच्या पोषाखाची निवड. लग्नासाठी साडी ही पहिली पसंती असली तरी वैविध्य मिळवण्यासाठी अन्य प्रकारही बघितले जातात. याच धर्तीवर सध्या लेहंगा किंवा घागरा ट्रेंडमध्ये आहे. रुपेरी पडद्यावर अभिनेत्रींनी घातलेल्या वजनदार घागर्‍यांची भुरळ तरुणींवर पडलेली दिसून येत आहे. त्यामुळे विशिष्ट पद्धतीच्या घागर्‍यांना बाजारपेठेमध्ये मागणी वाढत आहे. 
 
तुम्ही लग्नासाठी घागरा निवडत असाल तर काही बाबी जरूर लक्षात ठेवा. 
* घागरा खरेदी करण्यापूर्वी उंची, वजन, शारीरिक ठेवण याचा जरूर विचार करा. 
* बरेचदा घागरा डोळ्यांना छान दिसतो पण घातल्यानंतर तितकासा आकर्षक वाटत नाही. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी घागरा एकदा ट्राय करून पहा. 
* उंची जास्त आणि वजन करमी असेल तर घेरदार घागर्‍याची निवड करा. त्यामुळे लूक चांगला दिसेल. 
* उंची कमी पण वजन जास्त असणार्‍यांनी नाजूक डिझाईन असणारा घागरा निवडावा. त्यामुळे उंची जास्त भासेल आणि जास्तीचं वजन लपलं जाईल. 
* वजन जास्त असलं तरी उंचीच्या प्रमाणात शोभून दिसणारा फिटींगचा घागरा निवडावा. तो तुमच्यावर खुलून दिसेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Travel Health Tips प्रवासाच्या दरम्यान अस्वस्थ असाल, तर या गोष्टी लक्षात ठेवा