Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कायली जेनर करणार ‘खास’ लिपस्टिक्स लाँच

कायली जेनर करणार ‘खास’ लिपस्टिक्स लाँच
, सोमवार, 27 जून 2016 (12:47 IST)
रिअँलिटी टीव्ही शोवरचा प्रसिद्ध चेहरा कायली जेनर आपल्या कायली कॉस्मेटिक्स मेकअप रेंजमध्ये एक नवीन ‘खास’ लिपस्टिक्स लाँच करणार आहे. रिअँलिटी टीव्ही शोवरच प्रसिद्ध चेहर्‍याने स्नॅपचॅटवरील व्हिडिओमधून याची माहिती दिली आहे. 
 
कायलीने एका क्लिपसाठी पोज दिला. ही क्लिप रिलीज करताना तिने क्लिपच्या कॅप्शनमध्ये येत्या शुक्रवारी दोन ‘खास’ शेडस् पाहायला मिळतील असे कॅप्शनमध्ये लिहिले होते. 
 
कायलीच्या क्लिपमध्ये तिने दोन लिप किटस् दिले होते. कायली जेनर ही अमेरिकेची प्रसिद्ध टीव्ही शो अँक्टर असून तिने तिच्या बहिणीसोबत कायली कॉस्मेटिक्स नावाने कंपनी सुरु केली. आज तिच्या लिपस्टिक्सची महिला जगतात प्रचंड क्रेझ आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मधुमेहात अमलात आणा केवळ हे 2 घरगुती उपाय