हटके दिसण्यासाठी सध्या कोण काय करेल हे सांगताच येत नाही. आता हेच पहा ना, आपल्याकडे घुबड अशुभ मानलं जातं, पण सध्या फॅशन वर्ल्डमध्ये हेच घुबड सॉल्लिड ट्रेंडी आणि लोकप्रिय झालयं. घुबडच काय, पण सध्याची तरुणाई प्राणी-पक्ष्यांना गळ्यात घेऊन फिरत आहेत. म्हणजे खरेखुरे नव्हते, तर लेटेस्ट फॅशन अॅक्सेसरीजच्या रूपात ते त्यांच्या गळ्यातले ताइत बनले आहेत.
तसं पाहायला गेलं, तर अॅनिमल डिझाइन्स किंवा नक्षी ती तशी पूर्वीपासूनच प्रचलित आहे. म्हणजे साड्यांवर मोर, हत्ती यांची डिझाइन्स दिसतात. मात्र सध्या त्यांना नवं ग्लॅमर दिलं आहे. नेकलेस, ब्रेसलेट, अंगठ्या, कानातले अशा ज्वेलरीमध्ये विविध प्राणी पक्ष्यांचा समावेश झाला आहे. घुबड, हत्ती, मोर, साप, ड्रॅगन, सिंह आणि अगदी पालीच्या आकाराची ज्वेलरीही आजची हौशी तरुणाई वापरत आहे.
अशी ज्वेलरी वापरण्यामागे अर्थातच फॅशनचा भाग जास्त असला, तरी त्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख सांगण्याचाही प्रयत्न असतो. अॅनिमल ज्वेलरी लोकप्रिय होण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला आवडणारे प्राणी हव्या त्या आकर्षक रंगात उपलब्ध आहेत. त्यामुळे थोडा हटके आणि इंटरेस्टिंग लूक मिळतो. ही ज्वेलरी वेस्टर्न आउटफिटवर खुलून दिसते. योग्य प्रकारे निवड केल्यास संध्याकाळच्या पार्टीच साडी किंव इव्हिनिंग गाऊनवरही अॅनिमल सेंट्रिक ज्वेलरी छान दिसते.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा