तुम्हाला तुमची सेक्स अपील कायम ठेवायची असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या ओठांकडे लक्ष्य देण्याची गरज आहे. आज प्रत्येक महिला लिपस्टिकचा वापर करत आहे. त्या आपल्या संपूर्ण जीवनकालात किमान 5 किलो लिपस्टिक पोटात टाकतात पण त्याचा आरोग्यावर काही विपरीत प्रभाव पडतं नाही अस एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. लिप्सला जर हॉट बनवायचे असेल तर खाली दिलेल्या टिप्सचा वापर करावा.
रोज 5 ते 6 ग्लास पाणी प्यायला पाहिजे. पाण्यामुळे फक्त शरीराला लागणारी पाण्याचीच पूर्ती पूर्ण होत नाही तर ओठांची नमी कायम राहते.
बदलत्या मोसमाचा सर्वात जास्त प्रभाव ओठांवर पडतो. म्हणून नेहमी चांगल्या कंपनीचे लिप बाम दिवसातून दोन- तीन वेळा लावायला पाहिजे.
बऱ्याच लोकांना ओठांना चावायची सवय असते ती बदलायला पाहिजे. दीर्घ काळापर्यंत लिपस्टिकची चमक कायम ठेवण्यासाठी लिपस्टिक लावल्यानंतर टिशू पेपरने एक्सट्रा लिपस्टिक काढून घ्यावे. यामुळे लिपस्टिकची चमक पूर्ण दिवसभर कायम राहते.
डार्क कलरचे लिपस्टिक लिप्सला स्मॉल लुक देतात. जर तुमच्या ओठांचा आकार लहान असेल आणि त्याला मोठा लुक द्यायचा असेल तर नॅचरल कलरचे लिपस्टिक वापरायला पाहिजे.
जर ओठ जाड असतील तर कंशीलर आणि फॉउंडेशनच्या मदतीने लिप्सला पातळ शेप देऊ शकता. लिप लायनरने ऑउट लाइन ड्रॉ करावी आणि डार्क कलरचे लिपस्टिक त्यात भरायला पाहिजे.
जर लिप्सला हॉट लुक द्यायचा असेल तर स्ट्राबेरी आणि चेरी शेड्सचा लिपस्टिकसुद्धा लावू शकता.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा