Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पर्सचा रंग बदलू शकतं भाग्य

पर्सचा रंग बदलू शकतं भाग्य
पैशासंबंधी समस्या दूर करण्यासाठी शास्त्रांमध्ये अनेक नियम दर्शवले आहेत. हे नियम पाळल्यास जीवनात धनाची कमी भासत नाही. सर्वांकडे पर्स किंवा वॉलेट असतोच परंतू महिलांसाठी पर्स म्हणजे केवळ एक आवश्यक वस्तू नसून फॅशन स्टेटमेंट असतं. फेंगशुईप्रमाणे पर्सचा रंग आपलं भाग्य बदलू शकतं. तर जाणून घ्या कोणत्या रंगाच्या पर्सने बदलेल आपलं भाग्य:
काळा
अनेक लोकांना काळ्या रंगाचा पर्स ठेवायला आवडतं. काळा रंग कोणत्याही कपड्यासोबत मेळ खातो. काळा रंग धन आणि समृद्धीला संबोधित करतो. फेंग शुईप्रमाणे करियरमध्ये पुढे जाण्यासाठी काळ्या रंगाचा पर्स ठेवावा.
 
निळा
फेंग शुईप्रमाणे निळ्या रंगाचा पर्स वापरणे योग्य नाही. निळा रंग पाणी दर्शवतं आणि या प्रकारे निळ्या रंगाचा पर्स ठेवल्याने पैसा पाण्याप्रमाणे वाहून जातो. म्हणून निळ्या रंगाची पर्स वापरायला नको.

ब्राउन
आपल्याला अधिक खर्च करण्याची सवय असेल आणि आपण बचत करू शकत नसाल तर ब्राउन रंगाचा पर्स खरेदी करा. याने खर्च कमी होऊन बचत होईल.
 
गुलाबी
गुलाबी रंग प्रेम आणि आत्मीय संबंध दर्शवतं. ज्या स्त्रिया पार्टनरच्या शोधात असतील त्यांनी गुलाबी रंगाची पर्स वापरावी. परंतू आपला उद्देश्य पैसे कमावणे असेल तर या रंगाची पर्स वापरू नये.

हिरवा
हिरवा रंग उन्नती आणि जीवन दर्शवतं. या रंगाचा पर्स वापरल्याने आपण करिअरमध्ये नक्कीच प्रगती कराल. आपल्या जीवनात पुढे वाढण्यासाठी अनेक विकल्प मिळतील. हा रंग व्यवसाय करणार्‍यांसाठी विशेष आहे. याने व्यवसायात फायदा होईल.
 
पिवळा
पिवळा रंगाचा पर्स ठेवल्याने पैसा येत जात राहतो. यापेक्षा हलका पिवळा किंवा तांबट रंगाची पर्स अधिक उत्तम राहील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंगळामुळे या लोकांना मिळते घर आणि जमिनीचे सुख