Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फेंगशुईचे एकदम सोपे उपाय!

fengshuie
आधुनिक युगात फेंगशुईचे चलन बरेच वाढले आहे, ही एक चिनी पद्धती आहे आणि आजकाल भारतात फार पॉपुलर आहे. असेच फेंगशुईचे काही पॉपुलर नियम :-
 
• शयन कक्षात डोक्यासमोर मोठा आरसा नसावा आणि जर जागेची कमतरतेमुळे तेथेच ठेवणे गरजेचे असेल तर त्यावर कापड झाकून ठेवावे.  
 
• बेडरूममध्ये पाण्याचे चित्र किंवा मासोळीचे चित्र नाही ठेवावे.  
 
• उशीच्या खाली घड्याळ ठेवून झोपावे  
 
• पलंगावर आकड्या वाकड्या डिझाइनच्या चादरी घालणे टाळावे.  
 
• घरातील मुख्य दारासमोर कुठलेही उंच झाड नसावे.  
 
• घरात चेहरा बघण्यासाठी आरसा अंधुक, बाजूने तुटलेला नको.  
 
• पडदे घरात नक्की लावा पण संपूर्ण घरातील पडदे एकसारखे आणि फ्रीलवाले असावे.  
 
• पडद्यांमध्ये छल्ले पूर्ण असायला पाहिजे, कुठलाही छल्ला तुटलेला नसावा.  
 
• लाफिंग बुद्धा कोणी गिफ्ट दिलेला असावा त्याने घरात कढीच पैशाची चणचण होत नाही.  
 
• शुद्ध पाण्याचा स्रोत ईशान्य कोपर्‍यात असावा. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वास्तुपुरुष