देवीचे विविध रूप त्यांच्या वाहन, वेशभूषा, हात आणि शस्त्राने ओळखले जातात. देवीचं वाहन ओलूक, गरूड आणि गज अर्थात हत्ती आहे. अनेक ठिकाणी देवी कमळावर विराजमान आहे. प्रत्येक देवीचं वेगवेगळं रूप आहे तर जाणून घ्या गजलक्ष्मी देवीची माहिती...
पुराणात देवी लक्ष्मी यांचा जन्म समुद्र मंथन दरम्यान झाला होता ज्या भृगु यांची पुत्री होती. भृगु यांच्या पुत्रीला श्रीदेवी देखील म्हणतात. त्यांचा विवाह प्रभू विष्णूंसोबत झाला होता. अष्टलक्ष्मी माता लक्ष्मीच्या 8 विशेष रूप यांना मानले गेले आहे. देवी लक्ष्मीचे 8 रूप आहेत- आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी.
अष्टलक्ष्मी-
1. आदिलक्ष्मी : आदि लक्ष्मीला महालक्ष्मी म्हटलं जातं ज्या ऋषी भृगु यांची कन्या आहे.
2. धनलक्ष्मी : प्रभू विष्णूने एकदा कुबेर यांच्याकडून कर्ज घेतले होते आणि वेळेवर ऋण फेडू शकले नाही तेव्हा धनलक्ष्मीने विष्णूंना कर्ज मुक्त केले होते.
3. धान्यलक्ष्मी : ही लक्ष्मी घरात धान्य भरते.
4. गजलक्ष्मी : पशू धन दात्रीच्या देवीला गजलक्ष्मी म्हटलं जातं. पशूंमध्ये हत्तीला राजसी मानले आहे. गजलक्ष्मीने इंद्र देवाला समुद्रात दडलेलं हरवलेलं धन मिळवण्यात मदत केली होती. गजलक्ष्मीचं वाहन पांढरा हत्ती आहे.
5. संतानलक्ष्मी : संतानाची देवी संतानलक्ष्मीचे हे रूप मुलांना आणि आपल्या भक्तांना दीर्घायुष्य देण्यासाठी आहे. संतानलक्ष्मीचे हे एक मुलं मांडीवर, दोन घडे, एक तलवार आणि ढाल धरून, सशस्त्र असे आहे. इतर दोन हात अभय मुद्रेत दर्शवण्यात आले आहे.
6. वीरलक्ष्मी : ही लक्ष्मी जीवनातील संघर्षांवर विजय प्राप्ती आणि युद्धात विरता प्रदर्शित करण्यासाठी शक्ती प्रदान करते.
7. विजयलक्ष्मी किंवा जयालक्ष्मी : विजयाचा अर्थ आहे जीत. विजय किंवा जया लक्ष्मी जिंकण्याचे अर्थात यशाचे प्रतीक आहे. ही लक्ष्मी लाल रंगाच्या वस्त्रात कमळावर विराजमान आणि आठ शस्त्र धरलेली अशा रूपात दर्शवली जाते.
8. विद्यालक्ष्मी : विद्याचा अर्थ शिक्षासह ज्ञान देखील आहे. देवीचे हे रूप ज्ञान, कला आणि विज्ञानाची शिक्षा प्रदान करतं. विद्या लक्ष्मीला कमळावर विराजमान दर्शवले आहे. ज्यांचे चार हात आहे. पांढरे वस्त्र धारण केलेल्या या लक्ष्मीच्या दोन्ही हातात कमळ दिसून येते आणि दुसरे दोन हात अभय आणि वरदा मुद्रेत आहे.
या व्यतिरिक्त 8 अवतार सांगण्यात आले आहे-
महालक्ष्मी- वैकुंठात निवास करणारी
स्वर्गलक्ष्मी- स्वर्गात निवास करणारी
राधाजी- गोलोकमध्ये निवास करणारी
दक्षिणा- यज्ञमध्ये निवास करणारी
गृहलक्ष्मी- घरात निवास करणारी
शोभा- प्रत्येक वस्तूंमध्ये निवास करणारी
सुरभी (रुक्मणी)- गोलोकात निवास करणारी
राजलक्ष्मी (सीता)- पाताल आणि भूलोकात निवास करणारी
1. समुद्र मंथनाची महालक्ष्मी : समुद्र मंथनाची उत्पन्न लक्ष्मीला धनाची देवी मानले गेले आहे. त्या लक्ष्मीच्या हातात स्वर्ण भरलेला कलश असतो ज्याद्वारे लक्ष्मी धनाचा वर्षाव करते. त्यांचा वाहन पांढरा हत्ती आहे. महालक्ष्मीचे 4 हात दर्शवले आहेत. ते 1 लक्ष्य आणि 4 प्रकृती (दूरदृष्टी, दृढ संकल्प, परिश्रम आणि व्यवस्था शक्ती) चे प्रतीक आहेत आणि महालक्ष्मी सर्व हाताने आपल्या भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करते.
2. विष्णुप्रिया लक्ष्मी : ऋषी भृगु यांची पुत्री देवी लक्ष्मी होती. त्यांच्या आईचे नाव ख्याती होते. महर्षी भृगु विष्णूंचे श्वसुर आणि शिवाचे मेव्हणे होते. महर्षी भृगु यांना देखील सप्तर्षींमध्ये स्थान मिळालेले आहेत.
3. धनाची देवी : देवी लक्ष्मीचं देवराज इन्द्र आणि कुबेर यांच्याशी घनिष्ठ संबंध आहे. इन्द्र देवतांचे आणि स्वर्गाचे राज आहे आणि कुबेर देवतांच्या खजिन्याचे रक्षक पदावर आसीन आहे. देवी लक्ष्मी इन्द्र आणि कुबेर यांना वैभव, राजसी सत्ता प्रदान करते. देवी लक्ष्मी कमलवनात निवास करते, कमळावर विराजमान होते आणि हातात देखील कमळ धारण करते.
4. लक्ष्मीचे दोन रूप : लक्ष्मीला अभिव्यक्तीच्या दोन रूपामध्ये बघितलं जातं- 1. श्रीरूप आणि 2. लक्ष्मी रूप. श्रीरूपमध्ये त्या कमळावर विराजमान आहे तर लक्ष्मी रूपात प्रभू विष्णूंसोबत आहे.
महाभारतात लक्ष्मीचे 'विष्णूपत्नी लक्ष्मी' आणि 'राज्यलक्ष्मी' असे दो प्रकार सांगितले गेले आहेत.
एक आणखी मान्यतेनुसार लक्ष्मीचे दोन रूप आहे- भूदेवी आणि श्रीदेवी. भूदेवी धराची देवी आहे तर श्रीदेवी स्वर्गाची देवी. भूदेवी उर्वराशी निगडित आहे तर श्रीदेवी महिमा आणि शक्तीसह. भूदेवी सरळ आणि सहयोगी पत्नी आहे जेव्हाकि श्रीदेवी चंचल आहे. विष्णूंना त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात.