Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खंडोबाचे नवरात्र आणि चंपाषष्ठीचे महत्त्व

खंडोबाचे नवरात्र आणि चंपाषष्ठीचे महत्त्व
, शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019 (13:08 IST)
मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीला चंपाषष्ठी असे म्हणतात. या दिवशी महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा अर्थात मल्हारीचे उत्सव साजरं केले जाते. महाराष्ट्राच्या जेजुरीत हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. मल्हारी मार्तंड हे श्रीमहादेवाचा एक अवतार.
 
कृतयुगात मणी व मल्ल या राक्षसांना ब्रह्म देवाने, वर दिले होते की तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही. त्यामुळे ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले व ऋषीमुनी करीत असलेल्या तपश्चर्येला अडथळा आणून तेथे विध्वंस करू लागले. ऋषीमुनींनी अखेर कंटाळून देवांकडे मदत मागितली. तेव्हा महादेवांनी मार्तंड भैरवाचे रुप घेउन आपल्या सात कोटी सैन्य घेऊन मणी आणि मल्ला या दैत्यांचा पराभव करत संहार केला.
 
हा दिवस म्हणजे चंपाषष्ठी होय. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी मल्हारीचे नवरात्र सुरु होते. सहा दिवसांचे हे नवरात्र असून ह्याला चंपाषष्टी असे म्हटले जाते. मार्गशीर्ष  प्रतिपदे पासून शुद्ध षष्ठी पर्यंत हे नवरात्र साजरे केले जाते.
 
कुळाचार प्रमाणेच सुघट व टाक असतात. दररोज माळी सुघट या घटावर लावल्या जातात. नंदादीप किंवा अखंडदीप प्रज्वलित केले जाते. जेजुरी प्रमाणेच इतर देऊळात पण खंडोबाचा उत्सव साजरा होतो. वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्यात समावेश असतो आणि हेच नेवेद्य म्हणून खंडोबाला अर्पण केले जाते.
 
भंडारा (हळद) आणि खोबऱ्याची उधळण केली जाते. खंडोबाला भंडारा आणि खोबरे प्रिय आहे. मार्गशीर्षाच्या महिनेतला पहिला दिवस देवदिवाळी असत. ह्या दिवशी ग्रामदैवत, कुलदैवत यांची पूजा केली जाते. हा दिवस त्यांना आव्हाहन करण्याचा दिवस असतो. वडे, घारघे, आंबोलीचा नैवेद्य दाखवतात. चंपाषष्टी महाराष्टात मोठा सण आहे. आणि उत्साहात तो साजरा होतो.
 
"येळकोट येळकोट जय मल्हार"

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मार्गशीर्ष गुरुवार व्रत, या प्रकारे पूजा केल्याने महालक्ष्मी होईल प्रसन्न