Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व

वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व
प्रामुख्‍याने महाराष्ट्रात वट पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. ज्‍येष्‍ठ महिन्‍यात येणारी पौर्णिमा ही वट पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. हे व्रत विवाहित स्‍त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात.  यासाठी  वटवृक्षाची, वडाच्‍या झाडाची पूजा व प्रार्थना करतात. 
 
...म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात
 
पुराणकथेप्रमाणे भगवान शंकराचे लक्ष संसारात नाही म्हणून रागावलेल्या पार्वतीने त्याला तू वृक्ष होशील असा शाप दिला आणि तो वटवृक्ष झाला! महाप्रलय झाल्यावर सगळे चराचर नष्ट झाले तेव्हादेखील फक्त वटवृक्ष पृथ्वीवर घट्ट पाय रोवून उभा राहिला! त्याच्या प्रत्येक फांदी, पारंबी व पानातून सुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो. म्हणून त्याला अक्षयवट म्हटले गेले आहे. त्याच्या ह्या कालातीत अस्तित्वामुळे स्त्रिया त्याला अखंड सौभाग्याचे साकडे घालतात. गीता जन्माचा एकमेव साक्षीदार म्हणून देखील वटवृक्ष पूजनीय मानतात.  नैसर्गिक गुणाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबीयांना आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभावे हा त्यामागचा हेतू आहे. म्हणून वट पौर्णिमेला वडाच्‍या झाडाची पूजा करतात. 
 
व्रताची देवता
सावित्रीसह ब्रह्मा ही या व्रताची मुख्य देवता आहे. सत्यवान, नारद आणि यमधर्म या उपांग (गौण) देवता आहेत.
 
वटवृक्षाचे महत्त्व
यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शास्त्रचर्चा केली. त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले. शास्त्रचर्चा वटवृक्षाखाली झाली; म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले. ‘या दिवशी प्रकट स्वरूपात शिवतत्त्वस्वरूपी शक्ती ब्रह्मांडात वास करत असते. शक्तिरूपी जाणिवेतून शिवरूपी धारणेशी एकरूप होण्याच्या भावातून हे व्रत केले असता जीव-शिव एकरूपतेची अनुभूती येऊ शकते.
 
वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व 
वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे, म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एकप्रकारे स्मरून, त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी, यासाठी ईश्वराची पूजा करणे. 
 
कर्माला शिवाची जोड असेल, तर शक्ती व शिव यांच्या संयुक्त क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्याचा जिवाला फायदा होतो.
 
वटवृक्षाला सूत गुंडाळण्याचे महत्त्व 
वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणार्‍या सुप्‍त लहरी शिवतत्त्व आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात. ज्या वेळी वटवृक्षाच्या खोडाला सुती धाग्याने गुंडाळले जाते, त्या वेळी जिवाच्या भावाप्रमाणे खोडातील शिवतत्त्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात. सुती धाग्यातील पृथ्वी व आप या तत्त्वांच्या संयोगामुळे या लहरी जिवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात.
 
वडाच्या पूजनामध्ये फळे अर्पण करण्याचे कारण 
फळे ही मधुररसाची असल्याने फळांच्या समुच्चयाकडे आकृष्ट व प्रक्षेपित होणार्‍या देवतांच्या लहरी कमी कालावधीत जिवाच्या देहातील कोशापर्यंत झिरपतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वटपौर्णिमा व्रत करण्याची सोपी विधी