Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

7 डिसेंबर रोजी काल भैरव जयंती : या दिवशी हे 5 उपाय करा, कृपादृष्टी लाभेल

7 डिसेंबर रोजी काल भैरव जयंती : या दिवशी हे 5 उपाय करा, कृपादृष्टी लाभेल
, शनिवार, 5 डिसेंबर 2020 (15:22 IST)
काल भैरव जयंती यंदाच्या वर्षी 7 डिसेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार दर वर्षी कार्तिक महिन्यातील कृष्णपक्षाच्या अष्टमीला काल भैरव जयंती साजरी केली जाते. या दिवसाला कालाष्टमी म्हणून देखील ओळखतात. शास्त्रानुसार भगवान काल भैरवांचा जन्म कार्तिक कृष्णपक्षाच्या अष्टमीला झाला होता. या दिवशी विधिविधानाने काल भैरवाची पूजा केली जाते. त्यांचे आशीर्वाद आणि कृपादृष्टी मिळविण्यासाठी काही विशेष उपाय केले पाहिजे.
 
या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्यानं भगवान भैरवाचे आशीर्वाद मिळतात, कारण भगवान भैरवाचा जन्म भगवान शिवाचा एक अंश म्हणून झाला होता. कालाष्टमीला 21 बिल्वपत्रांवर चंदनाने 'ॐ नम: शिवाय' लिहून शिवलिंगावर अर्पण करा. या विधीने पूजा केल्यानं भगवान भैरव बाबा प्रसन्न होतील आणि आपली सर्व इच्छा पूर्ण होतील. 
 
काल भैरवजींना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपा मिळविण्यासाठी कालाष्टमीला भगवान भैरवाच्या मूर्ती समोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि श्री कालभैरवाष्टकम चे वाचन करावे. नवस पूर्ण होई पर्यंत दररोज हे उपाय भक्तिभावाने करावं.
 
काल भैरव जयंतीच्या दिवसापासून सतत 40 दिवस पर्यंत काल भैरवाचे दर्शन करावे. हे उपाय केल्यानं भगवान भैरव प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. भैरवाच्या पूजेच्या नियमाला चालीसा असे ही म्हणतात जी चंद्रमासाचे 28 दिवस आणि 12 राशी जोडून बनतात.
 
काल भैरव जयंतीच्या दिवशी भगवान भैरवाला प्रसन्न करण्यासाठी काळ्या कुत्र्याला गोड पोळी खाऊ घाला. जर काळा कुत्रा उपलब्ध नसेल तर कोणत्याही कुत्र्याला खाऊ घालून हे उपाय करू शकता. हे उपाय केल्यानं भगवान भैरवच नव्हे तर शनिदेव देखील आशीर्वाद देतात.
 
काल भैरव जयंतीच्या दिवशी भगवान भैरवाच्या देऊळात जाऊन शेंदूर, मोहरीचे तेल, नारळ, चणे, फुटाणे, पुए आणि जिलबी अर्पण करून भक्तिभावाने पूजा करावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देवदत्त आणि अनंत विजय शंखाची महत्ता जाणून घ्या