Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धर्म आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून उपयोगी आहे वडाचे झाड, जाणून घ्या आयुर्वेदात ह्याचे महत्त्व

धर्म आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून उपयोगी आहे वडाचे झाड, जाणून घ्या आयुर्वेदात ह्याचे महत्त्व
, रविवार, 31 मे 2020 (11:52 IST)
भारतात वंदनीय असलेल्या झाडांमध्ये वडाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक धर्माबरोबरच जैन आणि बौद्ध धर्मात वडाच्या झाडाला महत्त्वपूर्ण मानले आहे. ह्याला अमरत्वाचे प्रतीक देखील मानले जाते. 
 
स्कन्द पुराणानुसार वट सावित्रीचे उपास ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला करावे. गुजरात, महाराष्ट्र, आणि दक्षिण भारतातील बायका ज्येष्ठ पौर्णिमेला उपास करतात. 
 
आपल्या देशाची संस्कृती, सभ्यता आणि धर्माशी वडाचे जवळचे संबंध आहे. वडाला एकीकडे शिवाचे रूप मानले आहे, तर दुसऱ्या बाजूला पद्मपुराणात त्याला विष्णूंचे अवतार मानले गेले आहे. म्हणून सवाष्ण बायका ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला उपास ठेवून वड्याच्या झाडाची पूजा करतात. ज्याला वट सावित्री व्रत असे म्हणतात.
 
या दिवशी बायका वडाच्या झाडाची पूजा करतात. मुलाच्या इच्छेसाठी सुख शांती मिळविण्यासाठी प्रदक्षिणा घालतात. या दिवशी वादच झाडाला पाणी वाहून सूत गुंडाळून 108 वेळा प्रदक्षिणा घातली जाते. पुराणात असे लिहिले आहे की वडाच्या मुळात परमपिता ब्रह्मा, मध्य भागात विष्णू, आणि पुढील भागात महादेवाचा वास असतो.
 
अशा प्रकारे, या पवित्र झाडांमध्ये ब्रह्माण्डाचे निर्माण करणारे, सांभाळ करणारे, आणि नष्ट करणारे अश्या त्रिदेवांची दिव्या ऊर्जाचे अक्षय भांडार असतात. 
 
अशी आख्यायिका आहे की वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी पूजा केल्याने सुख आणि सौभाग्यात वाढ होते. काही भागात ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमा म्हणून साजरे करतात जे वट सावित्री व्रतासारखंच असतं. 
 
प्राचीन ग्रंथ वृक्षायुर्वेदात म्हटले आहे की जे यथासांग रूपाने वडाचे झाड लावतो, त्याला शिवधाम मिळत. धार्मिक दृष्टीने वडाचे महत्त्व तर आहेच, वैद्यकीय दृष्टीने देखील वड खूप उपयुक्त असे.
 
* आयुर्वेदिक मतानुसार वडाच्या झाडाचे सर्व भाग तुरट, गोड, थंड, आणि आतड्यांना संकुचित करणारे आहे.
* कफ, पित्तसारख्या विकारांचा नायनाट करण्यासाठी ह्याला उपयोगात आणतात.
* उलट्या, ताप, भान हरपणे या साठी देखील ह्याचा उपयोग केला जातो.
* हे तेज उजळते.
* ह्याचा सालं आणि पानांपासून औषधे देखील बनविली जातात.
* वट सावित्री किंवा वड पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला किंवा गरजूला यथोचित देणगी दिल्याने पुण्यफळाची प्राप्ती होते. 
प्रसादामध्ये गूळ आणि हरभरे वाटण्याचे महत्त्व आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गरूड पुराण काय असतं, मृत्यूनंतर याचे वाचन का?