Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सर्वसामान्यांच्या जगण्यातलं वास्तव ‘डबल सीट’

सर्वसामान्यांच्या जगण्यातलं वास्तव ‘डबल सीट’
, मंगळवार, 18 ऑगस्ट 2015 (10:13 IST)
स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी लागणारं बळ कुठून आणायचं, तर त्याचं उत्तर मिळेल ते डबल सीटमधून.. समीर विद्वांस अन् क्षितिज पटवर्धन या दोन तरुणांचा हा सिनेमा एक नवी उमेद देणारा आहे. जगण्याचं भान अन् स्वप्नांच्या एक्सप्रेस वे वर धावण्यासाठीची ऊर्जा देणारा.. आशेचा किरण देणारा असा सिनेमा आहे. 
 
मुंबईच्या मायानगरीत स्वत:चं हक्काचं घर असावं.. असं इथे येणार्‍या प्रत्येकाला वाटतं. केवळ छप्पर असावं, यापेक्षा मायानगरीत आपला जम बसवण्यामधली पहिली पायरी म्हणून याकडे पाहिलं जातं.. त्यापेक्षा अशाप्रकारचं स्वप्न ज्यावेळी पडतं.. त्यावेळी त्याच्या पूर्ततेसाठी जे काही करावं लागतं. त्या गोष्टीमधल्या अडथळ्यांच्या शर्यतीचा हा खेळ इथपर्यंतच हे सारं मर्यादित राहत नाही.. हे या डबल सीटचं शक्तिस्थान म्हणता येईल. जगण्यातला विरोधाभासावर नेमकेपणाने बोट ठेवणारी अशी ही डबल सीट आहे. आशेनिराशेच्या हिंदोळ्यावर असताना.. प्राक्तन अन् नियतीच्या खेळात होणारी फसवणूक अन् प्रत्यक्षात आपल्यासमोर काय वाढून ठेवलंय.. याचा अंदाज घेत पावलं टाकत असताना त्या ऊनपावसाच्या खेळात ऐकट्याने लढण्यापेक्षा आपल्यासोबत खांद्याला खांदा लावणारं एखादं कोणी असणं किती गरजेचं आहे. 
 
भार हलका होण्यासोबत पहिली लढाई हरली तर दुसरी लढाई जिंकण्यासाठीची उमेद जागवणं अन् ती आग चेतवत ठेवण्याची जी गरज असते ती आपल्या सुहृदानं करणं किती गरजेचं आहे, याचं भान हा सिनेमा आपल्याला देतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi