Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुलाबी : चित्रपट परीक्षण

गुलाबी : चित्रपट परीक्षण
, सोमवार, 15 सप्टेंबर 2014 (14:29 IST)
‘डय़ूटी विरुद्ध ब्यूटी’ची प्रेमकहाणी
 
सचिन खेडेकर गुणी अभिनेता आहे, हे सांगण्यासाठी माझ्या सर्टिफिकेटची गरज नाही. त्याच परफॉर्मन्समध्ये ते आपल्याला जाणवतं. ‘गुलाबी’मध्ये ते आपल्याला जाणवतं. हा पिंजरा कशाप्रकारे आहे. त्यामध्ये सावज कशाप्रकारे हेरलं जातं.. अन् कशी शिकार केली जाते, हे आपल्याला दिसतं.. जाणवतं.. ते मग गुन्हेगारीचं जग असो वा सौंदर्याचं.. एक ठिणगी पडताक्षणी नेमकी त्याला हवा लागली तर काय घडू शकतं.. तर गुलाबी. ही स्फोटक प्रेमकहाणी आहे. एसीपी अजरुन मालवणकर आपल्या प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ गुणांसाठी ओळखला जातो.. 70 एन्काऊंटर्स केलेला हा ऑफिसर अत्यंत सत्त्वशील आहे. चार्त्यिसंपन्न असलेल्या या ऑफिसरचं दमदार मिशन आपण बघतो, त्यानंतर भ्रष्ट गृहमंत्री अन् बार असोसिएशनच्या अध्यक्षांच्या डावपेचांमध्ये हा ऑफिसर एका प्याद्यासारखा वापरला जातो अन् आपलं कर्तव्य बजावत असताना त्या असोसिएशनच्या अध्यक्षाच्या बारवर छापा टाकतो. त्यावेळी गुलाबीची अन् त्याची भेट होते, पण या सगळ्या गोष्टीमध्ये एक ठिणगी सूडाची असते. कारण बार बंद करण्यासाठी सुरू झालेला हा खटाटोप आहे.

त्यावेळी गृहमंर्त्यांचे आदेश अन् या गोष्टींमध्ये सचिनचा अजरुन मालवणकर अन् त्या अंदाजामध्ये धारदार टोकेरी बाणा या सार्‍या दिसायला लागतो. त्याची अन् गुलाबीची भर बारमध्ये होणारी जुगलबंदी अन् त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम नेमका कसा होतो.. ते प्रेम अन् त्या सगळ्या गोष्टीला असलेलं सूडाचं वलय या सगळ्या गोष्टीमुळे गुलाबी अन् अजरुनमधल्या नात्यांमध्ये बदलत जाणारं प्रतल आपल्याला दिसत राहतं. प्रेम अन् कर्तव्यनिष्ठा यामधला हा संघर्ष आहे. गुलाबी ही स्फोटक प्रेमकहाणी म्हटली तरी आजच्या काळातील वेगळ्या धाटणीचा पिंजरा आहे, हे मान्य करायला हवं.. इथला मास्तर हा कर्तव्यनिष्ठ ऑफिसर आहे.. सचिन खेडेकर अन् गुड्डू धनोआ यांच्या कॉम्बिनेशनसाठी गुलाबी पाहायला हरकत नाही.. प्रेक्षकांसाठी हा पिंजरा वेगळा असेल. 

Share this Story:

Follow Webdunia marathi