Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चित्रपट परीक्षण: वास्तववादी कोर्ट

चित्रपट परीक्षण: वास्तववादी कोर्ट
, सोमवार, 20 एप्रिल 2015 (10:55 IST)
सुवर्ण कमळ विजेता चित्रपट ‘कोर्ट’ मोठय़ा पडद्यावर झळकलाय. आजच्या न्यायप्रक्रियेवर आणि कायदा सुव्यवस्थेवर भाष्य करणारा सिनेमा म्हणजे कोर्ट. कोर्ट या सिनेमाला सुवर्ण कमळ मिळाल्यानंतर या सिनेमाबद्दची उत्सुकता वाढली होती.



नारायण कामळे नावच्या एका 65 वर्षीय शाहिराची ही गोष्ट. कायम वेगवेगळ्या सामाजिक आशयावर पोवाडे गाणार्‍या, या शाहिराच्या एका कार्यक्रमादरम्यान एक गटार साफ करणार्‍या कर्मचार्‍याचा मृत्यू होतो. याच दरम्यान नारायण कामळे यांना अटक होते. या कर्मचार्‍याचा मृत्यू नारायण कामळे या शाहिरानं गायलेल्या पोवाडय़ामुळंच झालाय, असं पोलिसांचं म्हणणं असतं. एका शाहिरानं गायलेल्या पोवाडय़ाच्या आशयामुळे एका सफाई कामगाराचा मृत्यू कसा होऊ शकतो, यासाठी नारायण कामळे यांचे वकील विनय वोरा प्रयत्नशील असतात.

खरंतर ही कहाणी कुणा एकाची नसून कोर्ट हा सिनेमा खर्‍या खुर्‍या कोर्टाचं वास्तववादी दर्शन लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. याचबरोबर कोर्ट सिनेमातील अनेक पात्रांची गोष्ट सांगतो. गीतांजली कुलकर्णीनं साकारलेली नूतन ही व्यक्तिरेखा त्याचबरोबर अभिनेता विवेक गोंबरनं साकारलेली वकील विनय वोहरा ही व्यक्तिरेखा, यातला जज, या सगळ्या पात्रांची वैयक्तिक गोष्ट आणि हे चौघंही एकत्र असलेल्या या केसभोवती या सिनेमाची कथा रंगवण्यात आली आहे.

दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांनी अगदी क्रिएटिव्ह पद्धतीनं सिनेमाच्या कथेची हाताळणी केली आहे. आजच्या न्यायालयीन सुव्यवस्थेबाबतचं त्यानं वास्तवदर्शी चित्र प्रेझेंट केलंय. एक असा सिनेमा ज्याचा शेवटच नाही.

या सिनेमाची आणखी एक खासियत म्हणजे यात दिग्दर्शकानं जास्तीत जास्त नवोदित व्यक्तींचा वापर केलाय. गीतांजली कुलकर्णी आणि विवेक गोंबर हे दोन कलाकार वगळता यात सगळेच नॉन अँक्टर्स आहेत. या सगळ्या नॉन अँक्टर्सकडून काम करुन घेणं खरंच दिग्दर्शकासाठी मोठं आव्हान असेलच, पण त्यांनी ते खूप परफेक्टली निभावलंय. या एका वेगळ्या प्रयोगामळुे सिनेमाला खरंच एक रॉ लूक मिळवण्यात मदत झाली आहे. यामुळे सिनेमा खूप वास्तववादी वाटतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi