Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विटू-दांडी : चित्रपट परीक्षण

विटू-दांडी : चित्रपट परीक्षण
, शनिवार, 22 नोव्हेंबर 2014 (12:23 IST)
निर्माता : लीना देवरे   
स्टुडिओ :राजराधा मूव्हीज
दिर्ग्दशक : गणेश कदम  
कलाकार : दिलीप प्रभावळकर, रवींद्र मंकणी, अशोक समर्थ, यतीन कार्येकर, मृणाल ठाकूर, गौहरखान, विकास कदम, यांच्यासह बालकलाकार निशांत भावसार, शुभंकर अत्रे राधिका देवरे यांच्या भूमिका आहेत.
लेखक  : विकास कदम  
संगीत : संतोष मुळेकर
 
इतिहास जमा होणार्‍या विटू दांडू या खेळाचे ऐतिहासिक महत्त्व आणि स्वातंत्र्याच्या उंबरठय़ावर उलगडत जाणारी आजोबा-नातवाची हृदयभेदक कथा. अभिनय आणि ऐतिहासिक मूल्य जपणारे चित्रण यामुळे चित्रपट सुसह्य आणि देखणा झाला आहे.
 
अलीकडची मुले संगणक, सोशल नेटवर्किंगच्या मायाजाळात अडकून पडली आहेत, मात्र पूर्वी मुले मैदानी खेळ खेळून आपले स्वास्थ्य जपत.. परंतु त्याचबरोबर देशभक्तीही त्यांच्यात रूजवली जात असे. आजच्या मुलांना घर सोडून मैदानात येण्यासाठी आणि देशाच्या भक्तीसाठी प्रेरीत करणारा चित्रपट आहे. 
 
नातवा-आजोबाच्या नात्याला स्वातंत्र्य लढय़ाची किनार आहे.. आणि 'विटी दांडू'ची प्रमुख भूमिका आहे! महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कथा आधुनिक काळातले आजोबा भूतकाळातील कथा आपल्या आधुनिक नातवाला सांगत आहेत.. देशभक्ती, मैदानी खेळाचे महत्त्व, निसर्गाशी दोस्ती आणि बरेच काही शिकवणारा 'विटी दांडू' पाहायला हवा.. जरूर पैसे वसूल होतील.
हा चित्रपट आधुनिक आणि ऐतिहासिक पार्श्‍वभूमीवर घडणारा आहे. दिग्दर्शकाने अतिशय सुंदरपणे त्याचे चित्रण केले आहे. ऐतिहासिक पार्श्‍वभूमी असलेल्या चित्रपटाचे चित्रीकरण करताना खूप काळजी घ्यावी लागते. एखादे ठिकाण अथवा पात्र, वेषभूषा असो अथवा केशभूषा असो.. कटाक्षाने चुका होणार नाहीत, हे पाहावे लागते. या चित्रपटात रसिकांना अभिनेता अशोक समर्थ भारुड सादर करताना दिसेल. यासाठी अशोकने स्त्रीवेष धारण केला आहे. दिग्दर्शकाने उत्तमरीत्या मांडणी आणि सादरीकरण केले आहे. 
 
चित्रपटात प्रत्येक कलाकाराचे काम उत्कृष्ट झाले आहे. गोविंद (निशांत भावसार)चा अभिनय उल्लेखनीय झाला आहे. दाजी (दिलीप प्रभावळकर) यांच्या अभिनय कौशल्याबद्दल दुमत नाही. रवींद्र मंकणी, यतीन कार्येकर, अशोक समर्थ, मृणाल ठाकूर, विकास कदम, उदय देशमुख आदी कलाकारांचे काम उत्तम झाले आहे, म्हणून हा चित्रपट आवर्जून पाहावा. 

रेटिंग : 4 

Share this Story:

Follow Webdunia marathi