Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘तू ही रे’ : प्रेमाचा हटके त्रिकोण

‘तू ही रे’ : प्रेमाचा हटके त्रिकोण
, रविवार, 13 सप्टेंबर 2015 (19:59 IST)
दुनियादारी, प्यारवाली लव्हस्टोरी या सिनेमांची टीम पुन्हा एकदा एकत्र आली आहे ती ‘तू ही रे’ हा सिनेमा घेऊन.. संजय जाधव दिग्दर्शित, सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित स्टारर ‘तू ही रे’ हा सिनेमा बिग स्क्रीनवर झळकलाय. ‘तू ही रे’ अगदी सिनेमाच्या टायटलवरुनच तुम्हाला कळलं असेल की हा सिनेमा एक लव्ह स्टोरी आहे. या सिनेमातली कथाही फुल्ल टू फिल्मी स्टाईलचीच आहे. नंदिनी, भैरवी आणि सिद्धार्थ या तिघांची ही गोष्ट. सिद्धार्थ आणि नंदिनीचा सुखी संसार चालू असतानाच खासदार प्रतापराव भानुशाली यांची एंट्री होते. सिद्धार्थच्या कंपनीला 22 कोटींचं अनुदान देण्याचं आश्वासन ते करतात पण त्याबदल्यात सिद्धार्थपुढे काही अटी मांडल्या जातात. हा प्रस्ताव ऐकताच सिद्धार्थ बेचैन होतो आणि अचानक त्याचा भूतकाळ त्याच्या पुढे उभा राहतो. बेसिकली ‘तू ही रे’ ही एक लव्हस्टोरी असून, या सिनेमात सिद्धार्थ, नंदिनी आणि भैरवी यां तिघांचा लव्ह त्रिकोण यात रेखाटण्यात आलाय. 
 
खरं तर इंटर्वलनंतर सिनेमा स्पीड पकडतो, प्रेक्षकांना होल्ड करण्यात यशस्वी ठरतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi