Article Marathi Film Review %e0%a4%b8%e0%a5%89%e0%a4%b0%e0%a5%80 %e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%88 %e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%9a%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0 %e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80 108120100020_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'सॉरी भाई' रूचणार नाही

सॉरी भाई रूचणार नाही
IFM
दिग्दर्शक ओनीर यांची चित्रपटाची कथा नेहमीच हटके असते. 'माय ब्रदर निखिल' आणि 'बस एक पल' च्यानंतर त्यांचा 'सॉरी भाई' या चित्रपटातही त्यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे.

'सॉरी भाई' हा चित्रपट थोडा जास्तच बोल्ड आहे. आपल्या भावाच्या होणा-या पत्नीशी अर्थात वहिनाशीस अफेअर करण्याची ही थीम परंपरावादी प्रेक्षकांना नक्कीच रूचणार नाही एवढेच काय तर आधुनीक विचाराच्या लोकांनाही रूचणार नाही.

webdunia
IFM
व्यवसायाने वैज्ञानिक असणारा सिद्धार्थ माथुर (शरमन जोशी) हा लाजरा-बुजरा युवक आहे. त्याचा मोठा भाऊ 'हर्ष' (संजय सूरी) मॉरीशसमध्ये लग्न करणार असतो. त्याच्या लग्नासाठी सिद्धार्थ आपल्या आई-वडिलांना घेऊन मॉरीशसला जातो. हर्षच्या या निर्णयावर त्याची आई नाराज असते. मॉरीशसमध्ये पोहोचल्यावर हर्ष ‍आलिया (चित्रांगदा सिंह) या आपल्या नियोजी‍‍त पत्नीची भेट त्यांना घालून देतो.


webdunia
IFM
हर्ष कामात खुपच व्यस्त असतो आणि लग्नापूर्वी तो आपली सगळी कामे आटोपती घेतो. घरच्यांना मॉरीशस दाखविण्याची जबाबदारी तो आलियाला देतो. पण, आलीयावर नाराज असल्याने आई सिद्धार्थबरोबर फिरत असते. हर्ष आपणाकडे दुर्लक्ष करत असल्याचे आलियाला वाटू लागते. आणि ती सिद्धार्थकडे आकर्षित होते. सिद्धार्थही तिच्याकडे आकर्षित होतो पण, तो आपणावर आवर घालण्याचा प्रयत्न करतो.

आलिया जवळीक वाढवते तेव्हा सिद्धार्थही तिच्या प्रेमात पडतो. सिद्धार्थची आईला याबाबत संशय येतो. आणि हे सर्वांना कळते तेव्हा माथुर कुटूंबात वादळ येते. चित्रपट रोमांस आणि कॉमेडीने भरपूर आहे. चित्रपटात असे अनेक क्षण आहेत ज्यावेळी पोटधरून हसू येते आणि काहीवेळा डोळ्यातून पाणीही येते.

चित्रपटाची थीम रोचक आहे पण, चित्रपट रोचक वाटत नाही. शरमन जोशीचा अभिनय उत्तम आहे. चित्रांगदा सिंह ही नैसर्गिक अभिनेत्री आहे. आणि शबाना सारख्या सक्षम अभिनेत्रीसमोर तिने आपली वेगळी छाप सोडली आहे. शबाना आजमी यांनी नेहमीसारखाच ताकदीचा अभिनय केला आहे. बोमन यांनी त्यांना चांगली साथ दिली आहे. पण, संजय सूरी यांना जादा संधी मिळालेली नाही. काळ बदलला आहे, पण नातेसबंधांवर चर्चा होते तेव्हा प्रेक्षक परंपरावादी बनतात. 'सॉरी भाई' ची थीम भारतीय प्रेक्षकांना सहजासहजी पचणारी नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi