Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चौफेर मुलूखगिरी

चौफेर मुलूखगिरी

मनोज पोलादे

मिलिंद गुणाजी हे चतुरस्त्र व्यक्ती‍मत्व आहे. अभिनय, छायाचित्रण, लेखन, भटकंती या सर्वच प्रांतात त्यांनी यशस्वी मुलुखगिरी केली आहे. अभियांत्रिकीची पदविका घेतलेल्या गुणाजींनी सुरवातीला डिगजॅमसाठी पाच वर्षे माडेलिंग केले. त्यानंतर मग त्यांना गोविंद निहलानींचा 'द्रोहकाल' हा चित्रपट मिळाला.

दरम्यानच्या काळात त्यांची एक दूरचित्रवाणी मालिका गाजली. त्यात ते खलनायक होते. मग 'फरेब' या चित्रपटात त्यांना पुन्हा खलनायकाची भूमिका मिळाली. हा चित्रपट यशस्वी झाला आणि त्यांने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. त्यानंतर मग चित्रपटसृष्टीतील यशस्वी वाटचालीस सुरूवात झाली.

विरासत, सरकारनामा, जिंदगी जिंदाबाद, गॉडमदर, हजार चौरासी की मा या चित्रपटातून छाप पाडली. गॉडमदर या चित्रपटाला तर सात राष्ट्रीय पारितोषिके मिळाली. त्यांनी आतापर्यंत पन्नासहून अधिक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. त्याच्या अभिनयाची जातकुळी थोडी वेगळी आहे.

भरदार आवाज, रूबाबदार व्यक्तीमत्व, करडी नजर, उत्तम संवादफेक यामुळे त्यांचा पडद्यावरचा वावर सहज वाटतो. विशेष म्हणजे रूबाबदार व्यक्तिमत्व असूनही त्यांच्या वाट्याला खलनायकी भूमिका जास्त आल्या. मिलिंद गुणाजी हे रसिक व्यक्तीमत्व आहे. अभिनयासोबतच भटकंती व छायाचित्रणाचा त्यांचा छंद सर्वपरिचित आहे.

चित्रपटांच्या व्यापातून वेळ मिळाल्यास ते त्याचा उपयोग पर्यटनासाठी करतात. महाराष्ट्रातील नटलेला निसर्ग त्यांना नेहमी खुणावतो. मग एखादी कल्पना डोक्यात घेवून ते भटकंतीस निघतात. कॅमेरा, लेखन साहित्य व आवश्यक सामग्री घेऊन त्यांची दऱया खोऱे पालथे घालते. या भटकंतीवर आधारीत 'माझी मुलूखगिरी' हे पुस्तक साकारले.

त्याला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या पुस्तकाच्या दहा आवृत्या प्रसिद्ध झाल्या आहेत. भटकंती, चला माझ्या गोव्याला ही त्यांची इतर पुस्तके. भटकंतीस पुरक त्यांचा दूसरा छंद म्हणजे छायाचित्रण. भटकंतीत काढलेल्या छायाचित्रांची प्रदर्शने ठिकठिकाणी त्यांनी भरवली आहेत.

चित्रपटाच्या निमित्ताने त्यांचा आता जगभर प्रवास होतो. विविध भौगोलिक प्रदेश, नैसर्गिक सौंदर्य, संस्कृती, कला ते कॅमेरॅत टिपत असतात. एरवी कलाकार आपल्या आजूबाजूच्या व्यक्तिरेखा टिपत असतो. गुणाजींचा परिघ आणखी विस्तृत आहे.


मिलिंद गुणाजी अभिनित चित्रपट -

फरे
विरास
द्रोहकाल
गॉडमदर
त्रिशक्त
जो
असंभ
एला
दे
देवदास
सरकारनाम
झिंदगी झिंदाबा
हजार चौरासी की मां

लेखन-

माझी मुलुखगिरी

ऑफ बिट ट्रॅक्स इन महाराष्ट्रा


Share this Story:

Follow Webdunia marathi