होळी हा उत्साहाचा आणि नाविन्यतेचा सण आहे. सर्वाना एकत्र आणून एकाच रंगात न्हाऊन टाकणारा हा सण आहे. या सणाला कोणत्याही जातीचा रंग नसतो, प्रत्येक धर्माचे आणि जातीचे लोक एकत्र येऊन होळीत माणुसकीचा रंग चढवू शकतात. आपल्या स्वकीयांसोबत सण साजरा करण्याची मज्जा माझ्याहून चांगली कोण सांगणार? १० वर्ष शिक्षणासाठी मी घरापासून दूर होतो. होळीच्या निमित्ताने मला माझी माणस पुन्हा भेटायची. त्यात पुरणपोळीची लज्जत देखील असायची. शिवाय आज अनेक माणसं माझ्या या कुटूंबात दाखल झाली आहेत. "फोटोकापी" या माझ्या सिनेमाच नुकतच चित्रीकरण पुर्ण झालं असून, सेटवरचे प्रत्येकजण माझ्या कुंटूंबाचा भाग झाली आहेत. यावर्षीची होळी त्यांसोबत मी खेळणार आहे.