Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अलका कुबल वाढदिवस विशेष

अलका कुबल वाढदिवस विशेष
, गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (09:50 IST)
अलका कुबल या मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री आहेत. सुमारे दशकभर त्यांनी अभिनय केलेले चित्रपट, त्या चित्रपटांच्या विषयांनी स्त्री वर्गाला सिनेमागृहाकडे अगदी खेचुन आणले होते. मराठी फिल्म इंडस्ट्रीत सासर-माहेर चित्रपटांची लाट आणणारी एक अभिनेत्री अलका कुबल! 
 
अलका कुबल यांचा जन्म 23 सप्टेंबर रोजी 1963ला झाला होता. त्यांना दोन मुली असून एक पायलट आणि दुसरी डॉक्टर आहे. त्यांचे पती समीर आठल्ये हे छायाचित्रपार आहे.  
 
अलका कुबल याचं करिअर – Alka Kubal Career
मध्यमवर्गीय घरातील अलका कुबल यांना अभिनयाची आवड लहानपणा पासुनच होती. बालकलाकार म्हणुन ’नटसम्राट’ या नाटकाचे त्यांनी जवळजवळ 250 प्रयोग केले. या व्यतिरीक्त संध्याछाया, मी मालक या देहाचा, आणि वेडा वृंदावन या नाटकांमधुन देखील अलकाने रंगभुमीवर काम केलं आहे.
अलका कुबल (सासरच्या अलका आठल्ये) ह्या मराठी-हिंदी चित्रपटांतून काम करणाऱ्या एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत.  बालकलाकार म्हणून त्यांनी लहानपणापासूनच व्यावसायिक नाटकांतून काम करायला सुरुवात केली. इयत्ता १०वी मध्ये असताना त्यांनी चक्र या चित्रपटात छोटी भूमिका केली होती. नटसम्राट, संध्याछाया, वेडा वृंदावन अशा काही नाटकांत त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या. स्त्रीधन या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत व्यावसायिक अभिनेत्री म्हणून प्रवेश केला. 
 
माहेरची साडी ह्या प्रसिद्ध चित्रपटाच्या यशामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यासोबतच लेक चालली सासरला, तुझ्यावाचून करमेना, माहेरचा आहेर, दुर्गा आली घरा, काळूबाईच्या नावानं चांगभलं, सुवासिनीची सत्त्वपरीक्षा, अग्निपरीक्षा असे त्यांचे अनेक चित्रपट लोकप्रिय झाले. यांपैकी काही चित्रपटांची निर्मिती देखील त्यांनी केली. अमृतवेल, युगंधरा, बंदिनी, येरे येरे पैसा, आकाशझेप, माझी आई काळुबाई अशा दूरचित्रवाणी मालिकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केल्या. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शेहनाजचा भावुक करणारा व्हिडीओ व्हायरल, डोळ्यातून अश्रु वाहतील