Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 30 April 2025
webdunia

मीही या पुढे साडीचा पदर अंगावर घेणार नाही. मेघा घाडगे

megha ghadge
, सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 (14:48 IST)
Instagram
एका सांस्कृतिक कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून, विभत्स हावभाव करून नाचताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून सुरु झालेला वाद पुढे खूपच चिघळला. आता याच गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन एकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. या सर्व प्रकरणानंतर बिग बॉस फेम लावणी कलाकार अभिनेत्री मेघा घाडगे यांनी गौतमीची चांगलीच कानउघाडणी केली आहे. मेघा घाडगे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
खूप खूप धन्यवाद गौतमी पाटील. आज तुला लावणी क्वीन हा ‘किताब मिळाला. माफ कर खूप चूक झाली. खरंतर अशी लावणी असते हे आमच्या पूर्वज्यांना ही माहित न्हवत. का आम्हाला असं चुकीचं शिकवलं गेलं. का या शाहिरानीं कवन लिहिली???
 
पुस्तकातून चुकीचा लोककलेचा अभ्यास शिकवला. कृपाकारून बंद करा हे सगळं . विनाकारण लोककलवांतांनी पिढ्यान पिढ्या कलेच्या नावाखाली पुरस्कार घेत गेले आत्ता माझे डोळे उघडले.
मीही या पुढे साडीचा पदर अंगावर घेणार नाही. पायाखालून कमरेपर्यंत येईल तेवढी साडी, परकर वर करेन आणि पाण्याची बाटली घेऊन अंगावर ओली चिंब होईपर्यंत ओतेन. पायात घुंगरू घालू की नको ..? लक्षात नाही तू घातले होतेस का?
काल तर प्रेक्षकांना मधनं गर्दीत एकाचा खून झाला. खूप वाईट वाटलं ऐकून . पण तुझी ती भन्नाट अश्लील अदाकरी बघायला कोणाला नाही आवडणार. अभी तो पिचर बाकी हैं…!!
आम्ही आपले बसलोय अदाकारीची शिबीर करत, प्लीझ मला हे सगळं शिकावं अल्बम मध्ये केलंय थोडंसं (कटा कीरर्रर्र ) ते ही आयटम साँग म्हणून. पण स्टेज वर नाही केल कधी. मला तुझी शिष्य बनवशिल का??
 
कारण आम्हाला ही जगायच आहे . कलेनी पोट भरत नाही हे कळून चुकलंय, घुंगरू, शालू.. विकणे आहे .. प्लीझ मेसेज करा. पोटासाठी नाचते मीं परवा कोणाची … लव्ह यू गौतमी”, अशी पोस्ट मेघा घाडगेने लिहिली आहे.
याबरोबरच मेघा घाडगेने एक फेसबुक लाईव्ह करत गौतमी पाटील आणि तिच्या अश्लील लावणीबद्दल संताप व्यक्त केला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Palak Muchhal and Mithun सुप्रसिध्द पलक-मिथुन लग्नबंधनात