Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जयश्री गडकर यांना श्रद्धांजली (स्लाईड शो)

जयश्री गडकर यांना श्रद्धांजली (स्लाईड शो)

वेबदुनिया

, शुक्रवार, 29 ऑगस्ट 2008 (16:11 IST)
जगाला नैतिकतेचे डोस पाजणार्‍या भारतीय जनता पक्षाचे एकेक नेते नवनवीन वादात अडकत आहे. ताजा वाद आहे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार प्रकाश जावडेकर यांच्यासंदर्भातला. इंदूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या जावडेकरांची मद्याचे चषक हातात घेताना व चीअर्स करतानाची छायाचित्रे स्थानिक वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केल्याने भाजप चांगलाच अडचणीत आला आहे.

त्यांच्या या छायाचित्रांवरून सध्या मध्य प्रदेशातील राजकारण चांगलेच तापले असून, कॉग्रेसनेही जावडेकरांविरोधात टीकेची झोड उडवली आहे.

मंगळवारी जावडेकर इंदूरमध्ये एका खाजगी कार्यक्रमासाठी आले होते, कार्यक्रम आटोपून ते हॉटेलमध्ये परतल्यावर तेथे शॅंपेन पार्टी झाली. यात शॅंपेनची बाटली उघडतानाचा फोटो येथील वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे. सुरुवातीला हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु आता हे प्रकरण चांगलेच पेटले आहे.

यापूर्वी, भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस संजय जोशी हेही एका सेक्स कॅंडलच्या सीडी प्रकरणात अडकले होते. तर दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांचा उत्तराधिकारी म्हणून ज्याचे नाव घेतले जात होते, ते त्यांचे पुत्र राहुल महाजनही अमली पदार्थ सेवन करताना आढळून आल्याने भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा उघड झाल्याची टीका प्रदेश कॉग्रेस प्रवक्ते मानक अग्रवाल यांनी केली आहे.

WDWD


वैजयंता
सूर्यकांत यांच्याबरोबरही त्यांची जोडी चांगलीच जमली. 'पंचारती', रंगपंचमी, यासारख्या चित्रपटात त्यांनी सूर्यकांत यांच्या नायिकेचे काम केले. याशिवाय अरूण सरनाईक यांच्यासमवेतचे 'सवाल माझा ऐका', 'एक गाव बारा भानगडी' हे त्यांचे चित्रपटही चांगलेच गाजले. ग्रामीण चित्रपटातील नायिका त्यांनी ठसक्यात उभी केली. 'ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे' हे वैजयंतामधील गाणेही त्यांच्यावरच चित्रित झाले आहे. लता मंगेशकर यांनी आनंदघन या नावाने संगीत दिलेल्या सर्व चित्रपटात जयश्रीताईंच्या भूमिका आहेत आणि हे सर्व चित्रपट अफाट यशस्वी ठरले.

webdunia
WDWD


मानिन
प्रामुख्याने ग्रामीण चित्रपटांची नायिका म्हणून लोकप्रियता मिळविणार्‍या जयश्रीताई शहरी नायिकेच्या भूमिकेत यशस्वी ठरतील का अशी एक चर्चा होती. पण 'मानिनी'तील भूमिका पेलून त्यांनी ही चर्चाही वायफळ ठरवली. सोज्ज्वळ आणि सात्विक गृहिणीही त्यांनी अतिशय छान रंगवली. कदाचित त्यांच्यातले हे वास्तव त्यांना पडद्यावर उतरवणे फारसे अवघड गेले नसावे. त्यामुळे त्या शहरी नायिका म्हणूनही तितक्याच गाजल्या. मानिनीबरोबरच वैशाख वणवा असे शहरी चित्रपट देणार्‍या जयश्रीताईंनी 'मोहित्यांची मंजुळा'सारख्या ऐतिहासिक चित्रपटातील भूमिकाही तेवढ्याच ठसक्यात साकारली.

webdunia
WDWD


सासर-माहे
बाळ धुरी यांच्याबरोबर लग्न झाल्यानंतरही त्यांची अभिनय कारकिर्द सुरूच होती. या दोघांचेही 'पंढरीची वारी', 'अशी असावी सासू' हे चित्रपट आले. त्यांनी 'सासर माहेर' व 'अशी असावी सासू' या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटातही त्यांनी बर्‍याच भूमिका केल्या. पण त्यांना धार्मिक चित्रपटातील भूमिकाच जास्त मिळाल्या. अशोक कुमारबरोबर त्यांनी 'प्रायव्हेट सेक्रेटरी' या चित्रपटात नायिकेचे काम केले. मुकेशच्या आवाजातील 'सारंगा तेरी याद में' हे गाणेही त्यांच्यावरच चित्रित झाले आहे.

webdunia
WDWD


'चित्रभूषण' लोपल
त्यांना सहा चित्रपटांसाठी राष्ट्रपती पुरस्कार, पाच चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार, सहा चित्रपटांसाठी राज्य पुरस्कार तर चार चित्रपटांसाठी रसरंग-फाळके पुरस्कार मिळाले आहेत. पुरस्कारांची एवढी 'बरसात' होऊनही त्या विलक्षण साध्या होत्या. नुकताच त्यांना चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण हा पुरस्कारही देण्यात आला होता. मराठी रसिकांना आपल्या अभिनयाने संपन्न करणार्‍या जयश्रीताई नेहमीच आठवणीत राहिल. त्यांना वेबदुनियातर्फे श्रद्धांजली.

(सर्व छायाचित्रे- किरण जोशी)

Share this Story:

Follow Webdunia marathi