Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

निळू फुले : बेरकी खलनायक

निळू फुले :  बेरकी खलनायक

मनोज पोलादे

आपला दमदार आवाज व अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत अमीट ठसा उमटविणारा कलंदर कलाकार म्हणजे निळू फुले. निळूभाऊंनी साठच्या दशकापासून आतापर्यंत विविधांगी भूमिका केल्या आहेत. वैशिष्ट्यपूर्ण आवाज, संवादफेकीची वेगळी शैली, तिरपी व भेदक नजर आणि याला समर्थ अभिनयाची जोड या जोरावर निळूभाऊंनी अनेक भूमिकांचे सोने केले.

खलनायकी भूमिका त्यांच्या वाट्याला जास्त आल्या. त्यामुळे निळूभाऊ म्हणजे दृष्ट, कपटी पाटील, बेरकी इसम अशी त्यांची प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली. वास्तवात निळूभाऊ एकदम सहृदयी, दूसरयांना मदत करणारे व समाजकार्यात व चळवळीत अग्रेसर रहाणारे आहेत.

निळूभाऊंचे बालपणं मध्यप्रदेश व विदर्भात गेले. शिक्षणासाठी ते पुण्यात आले. येथेच राष्ट्र सेवा दलात कार्यकर्ता म्हणून काम करता करता सांस्कृतिक कार्यक्रमातून त्यांच्यातील अभिनेता जागा झाला. नोकरी करत असताना त्यांचा व्यापक जनसंपर्क होता. छंदास पुरक खटपटीही सुरू होत्या.

या काळात भरपूर वाचन केले. नाटक, सिनेमाची आवड असल्याने त्यांनी वगनाट्य लेखन, लोकनाट्यात अभिनय असे उपक्रम चालू ठेवले. ' कथा अकलेच्या कांद्याची' लोकनाट्यातील त्यांची भूमिका अतिशय गाजली. या संधीचे सोने करित स्वतला मराठी चित्रपटसृष्टीत प्रस्थापित केले.

सामना, शापित, सिंहासन, हीच खरी दौलत' या चित्रपटांमधून त्यांनी लक्षात राहण्याजोग्या भूमिका केल्या. पण त्यांची ओळख अजूनही टीकून आहे ती बेरकी पाटलाच्या रूपानेच.


निळू फुले अभिनित चित्रपट :

शापित
हीच खरी दौलत
सामना
एक गांव बारा भानगडी
जैत रे जैत
माझा पती करोडपती
रावसाहेब
दिशा
सिंहासन

नाटक :

बेबी
राजकारण गेलं चुलीत
प्रेमाची गोष्ट

हिंदी चित्रपट :

जरासी जिंदगी
वो सात दिन
मशाल
कुली

Share this Story:

Follow Webdunia marathi