Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्हिडिओ गेम उपयुक्त, पण मर्यादित

व्हिडिओ गेम उपयुक्त, पण मर्यादित
, शुक्रवार, 8 ऑगस्ट 2014 (15:21 IST)
गेल्या वीस वर्षातील मुला-मुलींच्या हालचाली, खेळ आणि व्यायाम यांची जी काही माहिती समोर येत आहे ती पूर्णपणे मनाला विचलित करणारी आहे. कारण ही मुले खेळतच नाहीत. सतत टीव्हीसमोर किंवा इंटरनेटसमोर बसलेली असतात. सतत बसून राहिल्याने त्यांना अनेक रोग जडलेले असतात, जाडी वाढलेली असते वगैरे टीका सदैव केली जाते. याचा अर्थ हे सगळे बैठे प्रकार वाईटच आहेत असा काढला जातो. पण ते सर्वस्वी खरे नाही. 
 
लहान मुले खेळत असलेले व्हिडिओ गेम हे तसे उपयुक्त असतात. कारण व्हिडिओ गेम खेळ्ण्यामध्ये चित्ताची एकाग्रता आणि इतर अनेक प्रकारची कौशल्ये मुलांना हस्तगत होत असतात. त्यांचा त्यांच्या बुद्धिमत्तेवर आणि जीवन कौशल्यावर सुद्धा चांगला परिणाम होत असतो. 
 
त्यामुळे व्हिडिओ गेम खेळणारी सगळीच मुले बाद झालेली असतात असे समजण्याचे काही कारण नाही. ब्रिटनमधल्या काही संशोधकांनी अजिबात व्हिडिओ गेम न खेळणारी मुले, दिवसातून एक तासपर्यंत गेम खेळणारी मुले आणि तीनपेक्षा अधिक तास गेमपुढे बसणारी मुले यांच्या मानसिकतेचा तौलनिक अभ्यास केला असता मर्यादित वेळ म्हणजे एक तासपर्यंत गेम खेळणारी मुले अन्य दोन गटांपेक्षा तुलनेने अधिक सक्षम असतात असे आढळले. 
 
अधिक वेळ गेम खेळणारी मुले आणि अजिबातच गेमच्या वाटेला न जाणारी मुले, मर्यादित वेळ गेम खेळणार्‍या मुलांच्या मानाने निर्णय क्षमतेत कमी पडतात असे दिसून आले.

Share this Story:

Follow Webdunia marathi