Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वाघाबद्दल 10 आश्चर्यकारक तथ्य

वाघाबद्दल 10 आश्चर्यकारक तथ्य
, शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020 (15:11 IST)
आपल्या पृथ्वीवर अनेक प्राणी आणि वनस्पती आहेत ज्यांची माहिती मुलांना पाहिजे. प्राण्यांचे तथ्य जाणून घेतल्याने त्यांना प्राण्यांना चांगल्या प्रकारे जाणून घेण्यास मदत मिळते. मुलांना ही माहिती पुस्तकांच्या माध्यमाने, टीव्हीच्या माध्यमाने, प्राणी संग्रहालयाच्या माध्यमाने द्यायला हवी. जेणे करून त्यांचा ज्ञानात भर पडेल आणि हे त्यांचा नेहमी लक्षात राहील.
 
आज याच शृंखलेत आपण वाघा बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.
 
1 वाघ ज्याला टायगर म्हणून ओळखतो हा पूर्ण विकसित झाल्यावर त्याची लांबी 11 फूट असते आणि वजन तब्बल 300 किलो ग्रॅम असतं. 
 
2 हा प्राणी मांजर कुटुंबातील सर्वात मोठी प्रजाती आहे.
 
3 वाघ हे उत्कृष्ट जलतरण पटू असतात आणि हे 6 किमी पर्यंत पोहू शकतात.
 
4 वाघ हा एकमेव असा शिकारी आहे जो रात्री देखील सहजपणे बघू शकतो आणि अंधाराचा फायदा घेत रात्री शिकार करतो.
 
5 वाघ आपल्या कुटुंबासाठी अन्नाच्या शोधासाठी 65 किमी प्रति वेगानं धावू शकतो. अश्या प्रकारे हे आपल्या शिकारावर हल्ला करण्यासाठी 5 मीटर उंची वर जाऊ शकतो.
 
6 भारत, चीन, रशिया आणि इंडोनेशिया मध्ये रॉयल बंगाल टायगर, सायबेरियन टायगर, सुमतरन टायगर आणि इंडोचायनीज टायगर आढळतात. 
 
7 वाघाची मुलं 2 वर्षाची होईपर्यंत आपल्या आई जवळच राहतात. 
 
8 शहरांच्या वस्तीकरणासाठी आणि जंगल कापल्यामुळे आणि या वाघाचा शिकार करण्यासाठी वाघांच्या काही प्रजाती विलुप्त झाल्या किंवा धोक्यात आल्या आहे.
 
9 वाघाच्या कळपाला 'एम्बुश' किंवा 'स्ट्रीक' म्हणतात.
 
10 वाघाचे गर्जन किंवा डरकाळी सुमारे 2 मैल पर्यंत ऐकू शकतो. या शिवाय वाघ हा फोफारू शकतो, गुरगुरवू शकतो आणि कण्हू देखील शकतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बारीक दिसायचे आहे मग कपड्यांमध्ये या रंगांचा वापर करा