Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हत्तीपेक्षाही महाग असतात या जनावराचे दात

हत्तीपेक्षाही महाग असतात या जनावराचे दात
आपण कधी 'जू'मध्ये गेला असाल तर, पाण्यात पूर्णपणे बुडलेला विशाल शरीराचा बेपर्वा जनावर नक्कीच बघितला असेल. हा आहे दुनियेतील सर्वात सुस्त जनावर, हिप्पोपोटेमस अर्थात समुद्री घोडा. हिप्पोपोटेमस हा शब्द ग्रीक शब्द हिप्पो आणि पोटेमस मिळवून तयार केलेला आहे. हिप्पोचा अर्थ घोडा आणि पोटेमसचा अर्थ नदी. परंतु हिप्पो घोड्यापेक्षा पिग फॅमेलीच्या अधिक जवळीक आहे.
* हा मुख्य रूपाने आफ्रिकन जनावर आहे. जो हळू-हळू पूर्ण दुनियेत पसरले. आज दुनियेत सव्वा ते दीड लाख हिप्पो उरले आहेत. मुख्य रूपाने हे झांबिया आणि टांझानियामध्ये दिसतात. परंतू 'जू'मुळे सामान्य लोकंही यांना बघू शकतात.
 
* हत्ती आणि गेंड्यानंतर धरतीवर हा दुनियेतील तिसरा सर्वात मोठा जनावर आहे. हिप्पो गेंड्याहून अधिक वजनी असतो. अनेक हिप्पोचे वजन 3600 किलो पर्यंतदेखील असतं. याची आयू 40 ते 50 वर्षापर्यंत असते.

* हिप्पो पाण्यात राहणे पसंत करतात. याचे मुख्य कारण यांचे पाय आहे. यांच्या शरीराच्या तुलनेत यांचे पाय लहान असतात. म्हणून यांना चालण्यात त्रास होतो. पाण्यात हे पोहत राहतात. यांच्या शरीरात नैसर्गिक सनस्क्रीन असतं ज्यामुळे सूर्याच्या प्रकाशापासून हे स्वत:ला वाचवतात.
 
* हे समूहात राहतात. यांचा एक मुखिया असतो आणि समूहात 40 हिप्पो एकमेकासोबत राहतात. एका समूहाकडे नदीचा 250 मीटर क्षेत्र असतं. समूहात ते मिळून जुळून राहतात.
 
* हिप्पो शाकाहारी असून पाण्यातून बाहेर येऊन हे घास खाणे पसंत करतात. हे रात्री चार ते पाच तासापर्यंत घास चरत राहतात. या दरम्यान ते 68 किलो घास चरून जातात आणि रात्रभरात पचवूनही घेतात. पहाटे होण्यापूर्वी पुन्हा पाण्यात चालले जातात.
 
* इतर जीवांप्रमाणेच हिप्पोचा सर्वात मोठा दुश्मन मनुष्य आहे. दात आणि मासासाठी यांचा शिकार केला जातो. हिप्पोचे दात हत्तीच्या दातातून ही अधिक महाग असतात, कारण हिप्पोचे दात काळांनंतरही पिवळे पडत नसून पांढरेच राहतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हे खा, बुद्धी वाढवा