Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जर विद्यार्थी या गोष्टींपासून दूर राहिले तर त्यांना यश मिळेल

जर विद्यार्थी या गोष्टींपासून दूर राहिले तर त्यांना यश मिळेल
, शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 (13:18 IST)
जीवनाला योग्य दिशा मिळावी यासाठी शिक्षणाचे अत्यंत महत्त्व आहे. योग्य शिक्षामुळे उज्ज्वल भविष्य तयार होऊ शकतं. आचार्य चाणक्य यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक रहस्य सांगितले आहेत. त्यांच्याप्रमाणे अभ्यास करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्यांच्याप्रमाणे या गोष्टींपासून लांब राहणे विद्यार्थी जीवानासाठी अत्यंत आवश्यक आहे- 
 
1. कामुकता
विद्यार्थ्यांनी स्वत:ला कामुकतेपासून लांब ठेवावे. या फेर्‍यात पडणार्‍यांचे अभ्यासात मन लागत नाही. नेहमी तेच विचार मनात असल्यामुळे भविष्य अंधारमय होतं.
 
2. क्रोध
आचार्य चाणक्य म्हणतात की क्रोध मनुष्याचा सर्वात मोठा शत्रु आहे कारण रागाच्या भरात विचार करण्याची क्षमता नष्ट होते. विद्यार्थ्यांनी क्रोध करणे टाळावे.
 
3. लोभ
लोभ अध्ययनाच्या मार्गात अडथळे निर्माण करतं. विद्यार्थ्यांनी कोण्यातही गोष्टीचा लोभ करु नये.
 
4. स्वाद
विद्यार्थी जीवन तपस्वी सारखे मानले गेले आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी स्वादिष्ट भोजनाचा मोह सोडावा. पौष्टिक व संतुलित आहार ग्रहण करावा.
 
5. श्रृंगार
सामान्य जीवनशैली विद्यार्थ्यांसाठी उत्तम असल्याची मानली गेली आहे. आवश्यकतेपेक्षा अधिक साज-सज्जा, श्रृंगार करणार्‍यांना विद्यार्थ्यांचे मन अभ्यात लागत नाही.
 
6. मनोरंजन
आचार्य चाणक्य यांचे म्हणणे आहे की मनोरंजन करत राहणे नुकसान करतं. शक्योतर केवळ मानसिक आरोग्यासाठी मनोरंजन करणे योग्य ठरतं.
 
7. झोप
निरोगी शरीरासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. याने मन शांत राहतं व अभ्यासात मन रमतं. अधिक आळसमुळे समय अभाव व अनेक प्रकाराच्या आजरांना सामोरा जावं लागू शकतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Pregnancy मध्ये हे पदार्थ खाणे टाळा