Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Healthy Mind मेंदू तीक्ष्ण करू इच्छिता? या टिप्स Brain Power वाढवण्यात प्रभावी

Healthy Mind मेंदू तीक्ष्ण करू इच्छिता? या टिप्स Brain Power वाढवण्यात प्रभावी
Increase Brain Power मेंदूला निरोगी आणि शक्तिशाली ठेवण्यासाठी लोक अनेक प्रकारचे उपाय करतात आणि डॉक्टरही अनेक औषधे घेण्याचा सल्ला देतात. मेंदूसाठी सकस आहाराबरोबरच व्यायामही खूप महत्त्वाचा आहे. तसेच आपण आपल्या दैनंदिन दिनचर्येत काही सोप्या गोष्टींचा अवलंब करून आपण मेंदूची शक्ती वाढवू शकतो. तर जाणून घ्या काही खास आणि सोप्या टिप्स-
 
मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी काय खावे?
मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी अक्रोड खावे. 
स्मरणशक्ती सुधारण्यासाठी अंबाडीच्या बिया वापराव्या. 
मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी बेरीज खाव्यात. मेंदू मजबूत करण्यासाठी फॅटी मासे खा. 
एवोकॅडो हा मानसिक दुर्बलतेवर उपाय आहे.
 
ब्रेन पॉवरफुल कसे करावे?
दररोज व्यायाम
मेडिटेशन
पोषक घटकांने भरपूर आहार
ताण घेणे टाळावे
ब्रेन पॉवर वाढवण्यासाठी बुद्धीबळ खेळावे.
काही नवीन शिकत राहावे.
चांगली पुस्तकं वाचावी.
 
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय करावे?
ध्यान केंद्रित करावे.
माइंड गेम्स खेळावे.
निरीक्षण करावे
पुरेशी झोप घ्यावी
नकारत्मक लोकांपासून लांब राहावे
व्यायाम
 
आहार कसा असावा?
फळं खाल्ल्याने मेंदू तेज होतो.
ब्लूबेरीज ब्रेन रिफ्रेश करण्यास मदत करतात.
डाळिंबात अनेक पोषक घटक असतात.
कीवी खाल्ल्याने मूड फ्रेश होतं.
स्ट्रॉबेरी मानसिक संतुलनासाठी योग्य आहे.
सं‍त्र्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळतं जे मेंदूसाठी आवश्यक आहे.
 
कमकुवत मेंदूला चालना कशी द्यावी?
पुरेशी झोप
आहारात हेल्दी फूड
दररोज ध्यान
व्यसनापासून दुरी
फास्ट फूड टाळा
 
ब्रेनसाठी योग्य काय?
हिरव्या पालेभाज्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी योग्य. या व्यतिरिक्त सुके मेवे, टॉमेटो, खडं धान्य, साल्मन आणि टूना मासे, बेरीज आणि डार्क चॉकलेट याचे सेवन योग्य ठरु शकतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

To look younger वाढत्या वयात तरुण दिसण्‍यासाठी 5 सोप्या ट्रिक्स