लहान मित्रांनो, सुटीत भटकंतीला जाण्याची योजना आखत असाल तर यंदा जंगलसफारीला जाण्याचा, प्राण्यांचा दुनियेची सफर करण्याचा विचार मनात घ्या. जंगल सफारी खूप थ्रीलिंग असेल. जंगल सफारीत खूप मजा येतो. येथे वेगवेगळ्या प्रकाराचे प्राणी मुक्तपणे फिरत असताना तुम्ही पाहू शकता. जंगलात फिरायला जायचं तर काही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. काही नियमांचं पालन करायला हवं. जंगल सफारीची योजना आखली असेल तर काय करायला हवं याविषयी....
जंगलात फिरायला गेल्यावर आरडाओरडा करू नका. यामुळे प्राणी घाबरतात, लपून बसतात. त्यामुळे फिरताना शांतता राखा.
जंगलात फिरायला जाताना कपड्यांकडे लक्ष द्या. गडद रंगाचे कपडे घालणं टाळा. निसर्गाशी साम्य साधणार्या रंगाचे कपडे घाला.
जंगलात फिरताना गाडीतून अजिबात उतरू नका. हात बाहेर काढू नका. प्राणी हिंसक नसला तरी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका.
जंगलात कचरा करू नका. प्लास्टिक पिशव्याल बाटल्या फेकू नका.
प्राण्यांची वास घेण्याची क्षमता माणसांपेक्षा जास्त असते त्यामुळे स्ट्रांग परफ्यूम लावू नका.
फोटो काढताना फ्लॅशचा वापर करू नका, फ्लॅशमुळे प्राण्यांना त्रास होऊ शकतो.
जंगलात गेल्यावर प्राण्यांना त्रास देऊ नका. तुम्ही त्यांच्या क्षेत्रात आला आहात हे लक्षात ठेवा.