Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तेल पाण्यावर का तरंगते जाणून घ्या

तेल पाण्यावर का तरंगते जाणून घ्या
, गुरूवार, 27 मे 2021 (08:25 IST)
आपण बर्‍याचदा पाहिले असेलच की जेव्हा आपण कधीकधी पाण्याच्या भांड्यात काही थेंब तेल टाकतो तेव्हा ते थेंब पाण्यावर तरंगू लागतात, परंतु आपण कधी असा विचार केला आहे की तेल पाण्यापेक्षा वजनी जास्त असतो तर हे कसे काय होते?
 
जेव्हा कोणती वस्तू पाण्यावर तरंगते तेव्हा त्याचे घनत्व पाण्यापेक्षा कमी असते,तेलाच्या रेणूचे घनत्व पाण्याच्या घनत्वापेक्षा कमी आहे.दुसरे असे की पाणी आणि तेल हे आपसात न विरघळणारे आहे.म्हणजे हे आपसात घुळत नाही जर आपण याला किती वेगाने ढवळले तरी ही काही वेळाने वेगळे होतात.म्हणून तेल पाण्याच्या वर तरंगते.दुसरी कडे बघावं तर या पाण्याचे रेणू ध्रुवीकरण केलेले असतात.पाण्याच्या रेणूच्या एका टोकाला सकारात्मक चार्ज आहे आणि एका टोकाला नकारात्मक चार्ज आहे.हेच कारण आहे की हे पाण्याचे रेणू आपसात चिटकतात तर तेलाचे रेणू ध्रुवीय नसतात, म्हणून तेल आणि पाण्याचे रेणू एकमेकांकडे आकर्षित होत नाही,या कारणास्तव तेल पाण्यावर तरंगते.   
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फायदेकारक आरोग्यवर्धक चविष्ट खसखसची खीर