Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आदरणीय शिक्षकांनी केलेल्या काही शिक्षा

आदरणीय शिक्षकांनी केलेल्या काही शिक्षा
शाळेत आपल्या आदरणीय शिक्षकांनी केलेल्या काही शिक्षा आठवल्या की पुन्हा एकदा त्यांचे आभार मानावेसे वाटतात. कारण त्यांतून त्यांनी काय शिकवले ते बघा-
 
बाकावर उभे राहा - आपली पातळी उंचवा. मोठे स्वप्न बघा.
हात वर करुन उभे राहा - उच्च ध्येय ठेवा, उंची गाठा.
भिंतीकडे तोंड करून उभे राहा - आत्मपरीक्षण करा.
वर्गाबाहेर उभे राहा - चार भिंतीतून बाहेर या, जग बघा.
गुडघे टेका - विनम्र व्हा.
कोंबडा व्हा - शारीरिक सहनशक्ती वाढवा.
फळा पुसा - झाले गेले विसरा आणि नव्याने सुरुवात करा.
तोंडावर बोट ठेवा - स्वत:च्या बाता कमी करा.
कान धरा - लक्षपूर्वक ऐका.
वाका, अंगठे धरून उभे राहा - लवचिक बना.
हा धडा दहा वेळा लिहा - अचूकतेसाठी सराव करा.
शाळा सुटल्यावर थांबा - जीवघेण्या स्पर्धेत उतरू नका, विशेष व्यक्ती बना.
 
- सोशल मीडिया

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

causes of heart attack : हार्ट अटॅक येण्याची कारणं आणि लक्षण जाणून घ्या