Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी महिन्यांची नावे आणि संपूर्ण माहिती Marathi Month Name

मराठी महिन्यांची नावे आणि संपूर्ण माहिती Marathi Month Name
, शनिवार, 26 मार्च 2022 (13:14 IST)
हिंदू कॅलेंडरनुसार एका वर्षामध्ये बारा महिने असतात. या बारा महिनांना बारामास असे म्हटले जाते. एका महिन्यातील एका दिवसाला तिथी असे म्हटले जाते. एक दिवस म्हणजे एक तिथी आणि एका दिवसामध्ये चोवीस तास असतात. महिन्याची गणना सूर्य आणि चंद्र यांच्या स्थितीनुसार होत असते. चंद्राच्या कमी-अधिक होण्याच्या स्थितीवरून एका महिन्याचे दोन भागांमध्ये विभाजन केले जाते. एका भागा मध्ये पंधरा दिवस असतात. त्याला कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष असे म्हणतात.
 
मराठी महिन्याची नावे
चैत्र 
वैशाख
ज्येष्ठ
आषाढ
श्रावण
भाद्रपद 
आश्विन 
कार्तिक 
मार्गशीर्ष 
पौष 
माघ 
फाल्गुन
 
इंग्रजी महिन्याची मराठी नावे
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
अक्टूबर
नोव्हेंबर
डिसेंबर
 
 
कृष्ण पक्ष-
पौर्णिमा आणि अमावस्या यांच्यातील 15 दिवसाच्या अंतराला कृष्णपक्ष असे म्हणतात. पोर्णिमेनंतरच्या दुसऱ्या दिवसापासून कृष्ण पक्षाची सुरुवात होते. कृष्ण पक्षामध्ये कोणत्याही शुभकार्याला सुरुवात करू नये असे म्हटले जाते. कारण कृष्ण पक्षांमध्ये चंद्राचा आकार हळूहळू कमी होतो आणि रात्रीचा अंधार वाढत जातो.
 
शुक्लपक्ष-
अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून शुक्लपक्षाची सुरुवात होते. या पक्षामध्ये चंद्र अधिक बलवान असतो आणि रात्र कमी होते. त्यामुळे या पक्षांमध्ये कोणत्याही कार्याला सुरुवात करणे शुभ मानले गेले आहे.
 
प्रत्येक महिन्याची माहिती
चैत्र महिना- हा महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत असतो. या महिन्यापासून ग्रीष्म ऋतू म्हणजेच उन्हाळ्याची सुरुवात होते. पंचांगानुसार चैत्र महिन्या पासून नववर्षाची सुरुवात होते. वर्षातील पहिला महिना म्हणून चैत्र महिना ओळखला जातो. या महिन्यात महाराष्ट्रात गुढी पाडव्याचा सण साजरा करून मराठी नववर्षाची सुरुवात होते.
 
वैशाख- मराठी कॅलेंडर चा दुसरा महिना वैशाख. इंग्रजी कॅलेंडर नुसार हा महिना एप्रिल ते मे पर्यंत असतो. वैशाख या महिन्यांमध्ये अक्षय तृतीया हा शुभ दिवस मानला जातो. या दिवशी श्राद्ध, दान, जप केल्याने पुण्य मिळते असे मानले जाते. या महिन्यात अधिकांश शेतकरी पीक काढतात.
 
ज्येष्ठ- ज्येष्ठ महिना हा अत्याधिक उष्ण महिना असतो. हा महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार मे व जून महिन्यात येतो. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते.
 
आषाढ- आषाढ महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार जून व जुलै महिन्यात येतो. या महिन्यात पावसाळाचे आगमन होते. या महिन्यातील महत्वपूर्ण सण म्हणजे गुरु पौर्णिमा व आषाढी एकादशी येतात.
 
श्रावण- श्रावण महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार जुलै व ऑगस्ट महिन्यात येतो. या रमणीय महिन्यात नागपंचमी, नारळीपौर्णिमा आणि गोकुळाष्टमी हे सण साजरे केले जातात. या संपूर्ण महिन्यात महादेवाची पूजा केली जाते आणि शेवटी बैलपोळा साजरा केला जातो.
 
भाद्रपद- भाद्रपद महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात येतो. या महिन्यात हरतालिका आणि गणेश चतुर्थी असे दोन खास सण साजरे केले जातात. दरम्यान गौरी पूजन थाटामाटात केलं जातं.
 
आश्विन- आश्विन महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात येतो. या महिन्यात नऊ दिवस देवीचा उपवास करणारा विशेष सण नवरात्र येते. यात नऊ धान्ये टाकून देवीचा घट बसविला जातो दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो.
 
कार्तिक- कार्तिक महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात येतो. अमावस्येला दिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे. नंतर पाडवा ते भाऊबीज लागोपाट उत्साहाने साजरे होणारे सण येतात. यात आणखी एक महत्वपूर्ण दिवस म्हणजे कार्तिक एकादशी.
 
मार्गशीर्ष- मार्गशीर्ष महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात येतो. या महिन्यात दत्त जयंती येते. तसेच मार्गशीष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते.
 
पौष- पौष महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार डिसेंबर व जानेवारी महिन्यात येतो. या महिन्याच्या सुरुवातीला मकर संक्रांति हा सण असतो.
 
माघ- माघ महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात येतो. या महिन्यात महाशिवरात्री हा सण येतो.
 
फाल्गुन- फाल्गुन महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार फेब्रुवारी व मार्च महिन्यात येतो. होळी आणि रंगपंचमी सण या दरम्यान साजरा करण्याची परंपरा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शरीरासाठी फायदेशीर मनुकाचे पाणी, सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या