Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाकाचा शेंडा सांगेल तुम्ही खोटे बोलताय

नाकाचा शेंडा सांगेल तुम्ही खोटे बोलताय
पिनाचिओची कथा तुम्हाला ऐकून माहिती असेलच. 19 व्या शतकातल्या या कथेतला पिनाचिओ हा इटालियन मुलगा. तो खोटे बोलला की त्याच्या नाकाची लांबी वाढायची.
 
सगळ्याच गोष्टी अगदी धादांत खोट्या नसतात बरं का! पिनाचिओच्या नाकाची लांबी खोटे बोलल्यावर वाढायची यात थोडेफार तथ्य असून शकते. कारण खोटे बोलण्याचा आणि नाकाचा काहीतरी संबंध आहे हे आता संशोधनातूनच सिद्ध झाले आहे. संशोधकांनी केलेल्या संशोधनात हे दिसून आले आहे की खोटे बोलणार्‍या माणसाच्या नाकाचा शेंडा गरम होतो.
 
आपण खोटे बोलतोय ते कळू नये अथवा तसा संशयही येऊ नये यासाठी माणसात जी अॅक्झायटी निर्माण होते त्याचा परिणाम म्हणून नाकाच्या शेंड्याचे तापमान वाढते असे आढळले आहे. हा शेंडा थंड करण्यासाठी बौद्धिक श्रम करावे लागतात असेही संशोधकांना आढळले आहे. या संशोधनाला पिनाचिओ इफेक्ट असेच नाव देण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Health Tips : आपल्या घरी आहे का हे औषधे