Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अंतराळवीरांचा अवकाशात मृत्यू झाल्यास त्यांच्या देहाचं काय होतं?

अंतराळवीरांचा अवकाशात मृत्यू झाल्यास त्यांच्या देहाचं काय होतं?
, रविवार, 3 सप्टेंबर 2023 (17:16 IST)
अमेरिकन अंतराळ संस्था (NASA) 2025 मध्ये चंद्रावर आणि आणखी दहा वर्षांत मंगळावर अंतराळवीर पाठवण्याचा प्रयत्न करत आहे.
मानवाला अवकाशात पाठवणं हे अवघड काम आहे, तसंच धोकादायकही आहे.
 
गेल्या 60 वर्षांत अशा घटनांमध्ये सुमारे 20 जणांचा मृत्यू झाला आहे.
 
1986 ते 2003 दरम्यान नासाच्या स्पेस शटल अपघातांमध्ये 14 लोकांचा मृत्यू झाला.
 
1967मध्ये अपोलो-1 लाँचपॅडच्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला. 1971च्या सुएझ 11 मिशनमध्ये आणखी तिघांचा मृत्यू झाला होता.
 
अंतराळ प्रवास कठीण आणि महाग आहे.
 
आता सशुल्क व्यावसायिक अवकाश प्रवासही सुरू झाला आहे. अंतराळ प्रवास आता सामान्य होत आहे.
 
अनेकांच्या मनात निर्माण होणारे प्रश्न म्हणजे - अवकाशात गेल्यावर मृत्यू झाला तर अंतराळवीरांच्या मृतदेहाचं काय होतं? तेथे अंत्यसंस्कार होतात का?
 
त्यांना परत कसं आणतात? एक महागडी, दीर्घ नियोजित सहल मध्येच संपवतात का?
 
भविष्यात लाखो किलोमीटर दूर असलेल्या चंद्रावर किंवा मंगळावर अमेरिकन अंतराळवीरांचा मृत्यू झाला तर? नासा काय करेल?
 
या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
 
'नासा'चे प्रोटोकॉल काय सांगतात?
अंतराळ प्रवासाला जाणारे अंतराळवीर आवश्यक तितके निरोगी आहेत याची खात्री नासाची 'द ट्रान्सलेशनल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर स्पेस हेल्थ' करुन घेतं.
 
"जर एखाद्या अंतराळवीराचा अवकाशात मध्येच किंवा 'पृथ्वीच्या खालच्या कक्षेत' ( 'low Earth orbit') मृत्यू झाला, तर काही तासांतच त्यांचं शरीर कॅप्सूलमध्ये पृथ्वीवर आणलं जाऊ शकतं", असं संस्थेत काम करणारे प्रोफेसर इमॅन्युएल उर्क्विएटा म्हणतात.
 
चंद्रावर जर एखाद्याचा मृत्यू झाला तर वेळेत मृतदेह पृथ्वीवर पोहोचणं कठीण होतं. त्यासाठी काही दिवस लागतील. नासानं अशा गोष्टींसाठी एक तपशीलवार प्रोटोकॉल देखील विकसित केला आहे.
 
जर एखाद्या मोहिमेवर कोणी मरण पावलं आणि त्याचवेळी अंतराळवीर पृथ्वीवर परत येत असतील तर, मृतदेह घाईघाईनं आणत नाहीत. बाकीचे अंतराळवीर सुरक्षित परत येणं हे संस्थेचे पहिलं प्राधान्य आहे.
 
पण, मंगळावर जाताना (30कोटी मैलांच्या प्रवासात) अंतराळवीराचा मृत्यू झाल्यास परिस्थिती वेगळी असेल.
 
मंगळावर मृत्यू झाला तर तिथे अंत्यसंस्कार होणार का?
अंतराळवीर खूप दूर जात असताना एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्यांना परत आणणं कठीण आहे. मोहिमेच्या शेवटी मृतदेह पृथ्वीवर परत आणण्यासाठी काही वर्षे लागू शकतात.
 
तोपर्यंत मृतदेह एका खास चेंबरमध्ये किंवा खास बॉडी बॅगमध्ये ठेवण्याची जबाबदारी अंतराळवीरांची असते.
 
अंतराळयानामध्ये स्थिर तापमान आणि आर्द्रता शरीराचं संरक्षण करण्यास मदत करते.
 
स्टेशन किंवा स्पेसक्राफ्टसारख्या ठिकाणी हे शक्य आहे. पण मंगळासारख्या ग्रहावर कसं करायचं? कारण तेथील हवामान वेगळं आहे.
समजा, अंतराळवीर मंगळावर पोहोचल्यावर कोणी मरण पावलं. त्यांना अंत्यसंस्कारासाठी जागा नसल्यामुळे त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांसाठी काम अवघड होतं.
 
कारण त्यासाठी त्यांना खूप ऊर्जा खर्च करावी लागते. त्यावेळी त्यांना मिशनचं काम करण्यासाठी फार ऊर्जा लागते. दुसरीकडे दफन करणे ही चांगली कल्पना नाही.
 
शरीरातील जीवाणू आणि इतर जीव मंगळाच्या पृष्ठभागाला दूषित करू शकतात. त्यामुळे मृतदेह जमिनीवर येईपर्यंत एका खास बॉडी बॅगमध्ये ठेवला जाईल.
 
(इमॅन्युएल उर्क्विएटा ह्यूस्टन मधील टेक्सास मेडिकल सेंटरमधील बेलर कॉलेज ऑफ मेडिसिनमध्ये अंतराळ औषध विषयाचे प्राध्यापक आहेत.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Fish Spa Side Effects :पायाचे सौंदर्य वाढवण्यासाठीच्या फिश स्पाचे दुष्परिणाम जाणून घ्या