Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एका दिवसात 24 तासच का असतात? आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलंय 'हे' उत्तर

Time
, बुधवार, 9 ऑगस्ट 2023 (17:33 IST)
आपल्या पूर्वजांनी मुळाक्षरांच्याही आधी मापन पद्धतीचा शोध लावला होता. त्याच धर्तीवर त्यांनी वेळ मोजायला सुरूवात केली. पण वेळ मोजणं किती कठीण आहे हे आज समजतं.
 
अवकाशीय घटना अर्थात खगोलशास्त्रीय घडामोडींच्या आधारे या मोजमापास सुरुवात झाली. पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते, वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये ही पद्धत मोठ्या प्रमाणावर वापरली गेली असावी.
 
याचं उदाहरण म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती जी प्रदक्षिणा घालते त्यानुसार एक दिवस किंवा एक वर्ष मोजलं जातं. पण महिने मोजण्यासाठी आपले पूर्वज चंद्रावर अवलंबून होते.
 
पण, काही मोजमापांचा खगोलशास्त्रीय घडामोडीशी काहीही संबंध नाही. उदाहरणादाखल आठवडे घेता येतील.
 
तास कसे मोजले जातात याची सर्वात जुनी नोंद इजिप्शियन चित्रलिपीत सापडते. असं म्हणतात की, तासाच्या या मापनाची पद्धत आधी उत्तर आफ्रिका, पश्चिम आशिया आणि नंतर युरोपमध्ये वापरण्यात आली. नंतर मात्र संबंध जगाने ही पद्धत वापरायला सुरुवात केली.
 
प्राचीन इजिप्तमधील वेळ
इ.स.पू 2400 च्या दशकात प्राचीन इजिप्तमध्ये 'पिरॅमिड टेक्स्ट' हा ग्रंथ लिहिण्यात आला. यांमध्ये 'वेनेट' नावाचा एक शब्द आहे. संशोधकांच्या मते, तास या शब्दाऐवजी या शब्दाचा वापर करण्यात आला असावा.
 
तासासाठी वेनेट हा शब्द का वापरण्यात आला हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला असयुत शहरात जावं लागेल. इथे इ.स.पू 2000 च्या दशकातील चौकोनी लाकडी शवपेट्यांच्या आत काही तक्ते कोरण्यात आले आहेत.
 
या तक्त्यांमध्ये वर्षाचा कालावधी दहा दिवसांनी भागून दाखवणारे स्तंभ आहेत. इजिप्शियन कॅलेंडरमध्ये एकूण 12 महिने असतात. इथे 320 दिवसांची, महिने आणि आठवड्यात विभागणी केलेली आहे.
 
प्रत्येक रांगेत 12 तार्‍यांची नावं लिहिली असून एकूण 12 स्तंभ आहेत. हा तक्ता आधुनिक 'स्टार चार्ट' प्रमाणे एका वर्षात आकाशातील ताऱ्यांच्या हालचाली दाखवतो.
 
या 12 तार्‍यांच्या मदतीने रात्र 12 भागात विभागलेली दिसते. पण इथे 'वेनेट' हा शब्द कुठेही वापरला नाही.
 
पण इ.स.पू. 16 ते 11 व्या शतकादरम्यान, या कोष्टकांमधील स्तंभ आणि वेनेट मध्ये सहसंबंध जोडण्यात आला.
 
आकाशातील परिणाम
अबायडोसच्या ओसिरियन भागातील एक मंदिरात काही कोष्टकं कोरली आहेत. यात सूर्य आणि इतर ताऱ्यांच्या हालचालींवर आधारित वेळ कशी मोजायची याचे तपशील मिळतात. असयुत शहरात सापडलेल्या शवपेटीमध्ये देखील असेच तक्ते आहेत. यात 12 स्तंभांसाठी वेनेट हा शब्द वापरण्यात आला आहे.
 
असं म्हणतात की, दिवसा 12 वेनेट आणि रात्री 12 वेनेट असतात. वेळ मोजण्यासाठी ही दोन परिमाणं स्पष्टपणे परिभाषित केली आहेत. आधुनिक मोजमापांशी हे अगदी तंतोतंत जुळतात.
 
यात दिवसाचे तास सूर्याच्या सावलीनुसार आणि रात्रीचे तास ताऱ्यांच्या हालचालींनुसार मोजण्यात आले आहेत. पण सूर्य आणि चंद्र दिसत असतानाच ही वेळ मोजली जाऊ शकते. दुसरीकडे, सूर्योदय आणि सूर्यास्त होत असताना वेळ कसा मोजायचा याचं कोणतंही मोजमाप इथे देण्यात आलेलं नाही.
 
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्हेनेशियन आणि आधुनिक तासांमध्ये थोडा फरक आहे. वेनेट वर्षभर सारखे नसतात. हिवाळ्यात रात्र मोठी असते आणि उन्हाळ्यात दिवस मोठा असतो.
 
पण इथे 12 हा आकडा कसा आला हे जाणून घेण्यासाठी 12 नक्षत्र दहा दिवसांच्या कालावधीसाठी का निवडले हे समजून घ्यावं लागेल. या प्रश्नाचं उत्तरही त्या तक्त्यांमध्येच मिळतं.
 
ताऱ्यांची वेळ
प्राचीन इजिप्शियन लोकांनी केंद्रबिंदू म्हणून 'सिरियस' ताऱ्याची निवड केली. त्यांनी इतर ताऱ्यांच्या हालचालीची तुलना सिरियस बरोबर करून वेळ मोजली.
 
मात्र, हे तारे वर्षभर दिसत नाहीत. ते वर्षातील 70 दिवस आकाशातून गायब असतात.
 
दर दहा दिवसांनी सिरियससारखा तारा आकाशातून गायब होतो. त्याच्या जागी एक नवीन तारा दिसतो. या घडामोडी वर्षभर सुरू राहतात.
 
वर्षातील विविध वेळेनुसार, रात्री आकाशात 10 ते 14 तारे दिसतात. दर दहा दिवसांनी त्यांच्या हालचालींचे मोजमाप केले जाते. जे शवपेटीच्या आतील बाजूस असलेल्या कोष्टकांशी मिळते जुळते असतात.
 
इ.स.पू 2000 च्या दशकातील या वेळेच्या मोजमापांवर नजर टाकली तर असं लक्षात येतं की, इथे अचूकतेला प्राधान्य देण्याऐवजी ते एका विशिष्ट पद्धतीने नोंदवून ठेवण्याला प्राधान्य देण्यात आलं आहे. कदाचित अशा प्रकारे त्या तक्त्यात 12 स्तंभ जन्माला आले असावेत. आजही असे तक्ते इजिप्शियन संग्रहालयात आढळतात.
 
दिवसात 12 तास आणि रात्री 12 तास असण्याची कल्पना आठवड्यातून दहा दिवस निवडण्याच्या कल्पनेतून जन्माला आली असावी. अशा प्रकारे आधुनिक काळाच्या मोजमापांचा पाया 4,000 वर्षांपूर्वी घालण्यात आला होता.
 
(रॉबर्ट कॉकरॉफ्ट हे मॅकमास्टर विद्यापीठात भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक आहेत, सारा सायमन्स या देखील प्राध्यापक आहेत.)
 





Published By- Priya dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Career in Ice Cream Taster : आईस्क्रीम टेस्टर मध्ये करिअर बनवा, पात्रता ,व्याप्ती जाणून घ्या