Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लाजवंतीचे रोपटे हात लावल्यावर कोमजून का जातात -असं का होतं-

लाजवंतीचे रोपटे हात लावल्यावर कोमजून का जातात -असं का होतं-
, मंगळवार, 25 मे 2021 (08:30 IST)
आपल्याला आपल्या अवती भवती हिरवेगार झाडे आवडतात,त्या झाडांमध्ये वेग वेगळे गुणधर्म असतात. काही झाडे अशी आहेत  जे काटेरी असतात. काही झाडांची पाने टाचण्या प्रमाणे टोकदार असतात. या मध्ये एक रोपटं आहे छुईमुईचे किंवा लाजवंतीचे. याला टच मी नॉट असे ही म्हणतात. जर या झाडाला हात लागला किंवा जोराचे वारे सुटले ,किंवा पाऊस आला तर हे झाड कोमजून जातं.
असं का होत जाणून घेऊ या. 
असं म्हणतात की हे झाड खूप लाजाळू आहे. मोठयाने आवाज आल्यावर हे कोमजून जातं.  या झाडाचे वनस्पति नाव 'मिमोसा प्यूडिका' आहे. शास्त्रज्ञाच्या मते,वनस्पतीच्या पानांमध्ये अनेक पेशी असतात ज्यामध्ये द्रव भरलेला असतो.  पेशींचा हाच द्रव त्याच्या पानांना उभे राहण्यास मदत करतो परंतु या द्रवपदार्थ मध्ये हालचाल झाल्यावर या झाडातील द्रव पदार्थाचे दाब कमी होते. या मुळे याची पाने कोमजतात. 
ही वनस्पती प्रामुख्याने भारतातील उष्ण प्रदेशात आढळते. पावसाळ्यात या वनस्पतीत जांभळे,गुलाबी,आणि निळ्या रंगाची फुले येतात. याचा पानात अँटी व्हायरल आणि अँटिफगल गुणधर्म आढळतात.  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कडुलिंबाचे फायदे जाणून घ्या