Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

World Environmental Health Day 2023:जागतिक पर्यावरण आरोग्य दिनाचा इतिहास, महत्त्व आणि थीम जाणून घ्या

World Environmental Health Day 2022
, मंगळवार, 26 सप्टेंबर 2023 (09:30 IST)
World Environmental Health Day 2023:2011 पासून दरवर्षी 26 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यावरण आरोग्य दिन साजरा केला जातो. जागतिक पर्यावरण आरोग्य दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे पर्यावरणाच्या होत असलेल्या हानीकडे लोकांचे लक्ष वेधणे आहे.  कारण सतत पर्यावरणाची हानी होत असल्याने मानवी जीवनालाही त्रास सहन करावा लागत असल्याचे मानले जाते. आपले आरोग्य आपल्या पर्यावरणाशी जोडलेले आहे. मानवी शरीरात आणि बाहेरील आरोग्य समस्या पर्यावरणीय घटक मानल्या जातात.

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रदूषणामुळे जगातील लोक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना श्‍वसन आणि त्वचेशी संबंधित आजार होत आहेत. याशिवाय हरितगृह परिणाम, हवामान बदल, शहरीकरण इत्यादींमुळे आपले अन्न, पाणी आणि हवेच्या गुणवत्तेवर थेट परिणाम होतो. त्यामुळे लोक अनेक आजारांना बळी पडतात.या मुळे रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. तत्सम समस्या लक्षात घेऊन आणि लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एन्व्हायर्नमेंट हेल्थ - IFIH ने याची सुरुवात केली. IFEH जवळपास 32 वर्षांपासून या समस्यांवर काम करत आहे.जागतिक पर्यावरण आरोग्य दिनाचा इतिहास, महत्त्व जाणून घेऊ या. 
 
जागतिक पर्यावरण आरोग्य दिन: इतिहास -
जागतिक पर्यावरण आरोग्य दिन दरवर्षी 26 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. याची सुरुवात 2011 मध्ये डेन्पास, बाली, इंडोनेशिया येथे पर्यावरण आरोग्य शिखर परिषद आणि IFEH बैठकीदरम्यान झाली. जगभरात हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांचे लक्ष त्यांच्या आरोग्याकडे वेधणे आहे. 
 
जागतिक पर्यावरण दिनाची थीम
पर्यावरणीय आरोग्य कार्यबलाच्या पाठिंब्याने, IFEH आरोग्य आणि हरित पुनर्प्राप्तीला समर्थन देते. या कारणास्तव, दरवर्षी जागतिक पर्यावरण आरोग्य दिनाची थीम निवडली जाते.प्लॅस्टिकचा वापर पर्यावरणासाठी अत्यंत हानिकारक आहे याची जाणीव सर्वांना असून त्याचा वापर थांबविण्यावर आपण भर दिला पाहिजे. अशा परिस्थितीत यंदाची थीमही यावर आधारित असून, ‘बीट प्लास्टिक पॉल्यूशन’ अशी आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कंटाळा, कुणाला कधी येत नाही, अस कुणी आहे का?