आपल्या स्वप्नांचा अर्थ काय?

आम्ही सर्व स्वप्न बघतो. प्रत्येक स्वप्नाचे वेगळे अर्थ असतात. जाणून घ्या काही स्वप्न आणि त्यांचे अर्थ:
भाग्योदय दर्शवणारे स्वप्न: स्वप्नात स्वत:ला जळताना, एखाद्याचा खून करताना, पर्वत चढताना, धार्मिक कार्य किंवा देवी- देवतांची मूर्ती पाहणे, कडू पदार्थ खाणे, स्वत:ला रडताना बघणे, असे काही दिसणे आपल्या व्यवसायात किंवा नोकरीत आपली उन्नती होण्याचे संकेत आहे.
 
धन प्राप्ती दर्शवणारे स्वप्न: स्वप्नात नभात उडणे, नदीत किंवा समुद्रात पोहणे, उंच जागी बसणे उन्नतीचे प्रतीक आहे. स्वप्नात स्वत:ला मला मध्ये पडलेले किंवा शरीरावर सर्प दिसणे, किंवा सर्पदंश होणे असे दिसण्याचा अर्थ आहे की आपल्या धन प्राप्ती होणार आहे. स्वप्नात तुटलेले छप्पर दिसल्यास धनप्राप्तीचे योग असतात. स्वप्नात सर्प खजिन्याची राखवली करताना दिसत असेल तर धनलाभ मिळेल.

मृत्यू: स्वप्नात दात तुटणे आजारी पडण्याचे संकेत आहे. महीस दिसल्यावर मृत्यू निकट आहे असे समजावे. स्वत:चा कापलेला हात पाहणे जवळच्या नातेवाइकाची मृत्यूचे संकेत देतं.
 
मनोकामना पूर्ती करणारे स्वप्न: स्वप्नात गुलाबाचे फूल दिसले तर समजा आपली मनोकामना पूर्ण होणार आहे.
पारिवारिक सुख: स्वप्नात एखाद्याच्या मृत्यूवर रडत असताना दिसल्यावर तो व्यक्ती दीर्घायू होतो. मुलांशी खेळणे कौटुंबिक सुख दर्शवतं. स्वप्नात मोठ्याचा आशीर्वाद मिळण्याचा अर्थ मान-सन्मानात वृद्धी होईल.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख दैनिक राशीफल 15-09-2016