करियरसाठी कधी आणि कुठे लावावा दिवा

देवासमोर संध्याकाळी दिवा लावण्याची पद्धत फार जुनी आहे. आजही घरातील मोठेच नव्हे तर तरुण पिढीदेखील चांगल्या करियरसाठी दिवा लावताना दिसते. कोणी पिंपळाच्या झाडाखाली तर कोणी देवापुढे दिवा लावतात. असेच बघू या कधी आणि कुठे दिवा लावण्याने काय परिणाम प्राप्त होऊ शकतात: 
सोमवार
सोमवारी महादेवाच्या मंदिरात दिवा लावण्याने मुलींना मनासारखा नवरा मिळतो. लव मॅरिज करू इच्छित असलेल्या तरुणींनाही ही पद्धत लागू पडेल.
 

करियरसाठी पुढे वाचा.....

मंगळवार
मंगळवारी विष्णू मंदिरात आणि केळीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावल्याने आरोग्य लाभतं. अभ्यासात मन नसणार्‍यांनीही दिवा लावल्याने त्यांना फायदा होईल.


बुधवार
बुधवारी विष्णू आणि गणपतीला प्रसन्न करण्यासाठी तुपाचा दिवा लावावा. याने वायफळ खर्च वाचेल, समस्या दूर होतील आणि अभ्यासात मन रमेल.


गुरुवार
गुरुवारी विष्णू देवाच्या मंदिरात किंवा केळीच्या झाडाखाली दिवा लावावा. याने जीवनातील अडथळे दूर होऊन सर्व इच्छा पूर्ण होतील. 


शुक्रवार
शुक्रवारी दुर्गा देवीच्या मंदिरात तुपाचा दिवा लावल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. सौभाग्य लाभतं.


शनिवार
शनीचा प्रभाव असलेल्या लोकांनी शनिवारी हनुमान किंवा पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावल्याने अडथळे दूर होतात. विशेष म्हणजे करिअरमधील समस्या दूर होतात. ज्यांचा अभ्यास लक्ष लागत नाही त्यांनी हा उपाय करावा.

वेबदुनिया वर वाचा