Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुरु ग्रहाच्या शांतीसाठी सोपे उपाय

गुरु ग्रहाच्या शांतीसाठी सोपे उपाय

वेबदुनिया

बर्‍याच वेळा वेळी अवेळी एखादे ग्रह अशुभ फल देतात, अशात त्यांची शांती करणे गरजेचे असते. गुरु ग्रहाच्या शांतीसाठी काही शास्त्रीय उपाय दिले आहे. यातून एखादा उपायही तुम्ही केला तर तुमच्या अशुभतेत नक्कीच कमी येऊन शुभ फल मिळण्यास सुरुवात होते. 

ग्रहांच्या मंत्रांची जप संख्या, द्रव्य दानाची सूची इत्यादी सर्व प्रकाराची माहिती आपणास देत आहे. मंत्र जप स्वतः करावा किंवा एखाद्या ब्राह्मणाकडून करवून घ्यावा. दान द्रव्याच्या यादीत दिले गेलेले पदार्थांना दान करण्याच्या व्यतिरिक्त त्यात लिहिलेले रत्न-उपरत्नांच्या अभावात जडी बूटींना विधिवत स्वतःधारण करावे, याने शांती मिळेल.

गुरुसाठी वेळ : संध्या समय सर्वात उत्तम. 
 
महादेवाचे पूजन केले पाहिजे. श्रीरुद्राचा पाठ करावा. गुरुच्या बीज मंत्राचा संध्या वेळेस 19,000 जप 40 दिवसात पूर्ण करावे. 
 
मंत्र : 'ॐ ग्रां ग्रीं ग्रौं स: गुरुवे नम:।'
 
दान-द्रव्य : पुष्कराज , सोनं, कांसी, चण्याची डाळ, खांड, तूप, पिवळा कपडा, पिवळे फूल, हळद, पुस्तक, घोडा, पिवळ्या फळांचे दान केले पाहिजे. 
 
गुरुवारी उपास करायला पाहिजे. 
 
रुद्राभिषेक करायला पाहिजे. 
 
पांच मुखी रुद्राक्ष धारण करावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बुधवारी कर्ज देण्यास टाळावे!